रायगड : कशेडी घाटात नायट्रोजन गॅसची वाहतूक करणारा टँकर ७० फूट दरीत कोसळला

रायगड : कशेडी घाटात नायट्रोजन गॅस वाहतूकीचा टँकर दरीत कोसळला
Raigad: nitrogen gas tanker fell into a 70 feet ravine in Kashedi Ghat
रायगड : कशेडी घाटात नायट्रोजन गॅस वाहतूकीचा टँकर दरीत कोसळलाPudhari Photo
Published on
Updated on

पोलादपूर - धनराज गोपाळ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो खचलेल्या रस्त्यावरून चढत असताना वाहनाने पिकअप न घेतल्याने पाठीमागे येऊन खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज (बुधवार) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत घडली आहे.

Raigad: nitrogen gas tanker fell into a 70 feet ravine in Kashedi Ghat
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसचा ब्रेक फेल; प्रवाशांच्या धावत्‍या बसमधून उड्या...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चालक अफिझुर रेहमान (वय ५५ वर्षे) हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक क्रमांक एम एच ०५ ए एम २८१४ यामध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात होता. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत आले असता येथील खचलेल्या रस्त्यावर चढत असताना गाडीने पीक अप न घेतल्याने गाडी मागे येऊन थेट बॅरिकेड्स तोडून सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक अफिझुर रेहमान (वय ५५ वर्षे) हा जखमी झाला आहे.

Raigad: nitrogen gas tanker fell into a 70 feet ravine in Kashedi Ghat
Mazi Bahin Ladki Yojana : 'माझी बहीण लाडकी योजने'साठी पैसे मागणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण धडे, उपनिरीक्षक समेळ सुर्वे, पोलिस हवालदार चिकणे, रामागडे, माजलकर यांच्यासह पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलिस हवालदार रविंद्र सरणेकर, पोलिस हवालदार घुले, ट्रॅफिक हवालदार धायगुडे, काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर ,१०८ रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम, महाड नगर परिषद आणि महाड एमआयडीसी येथील अग्निशामक यंत्रणेला कशेडी व पोलादपूर पोलिसांनी पाचारण केले. येथील तीन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून महामार्ग पोलिसांकडून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत सुरू ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news