अमरनाथ यात्रेकरूंच्या बसचा ब्रेक फेल; प्रवाशांच्या धावत्‍या बसमधून उड्या...

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसचा ब्रेक फेल, जवानांनी 'असे' वाचवले ४० जणांचे प्राण
Passengers jump from speeding bus after brakes fail on Jammu Srinagar highway
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसचा ब्रेक फेलFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

जम्‍मू काश्मीरच्या राष्‍ट्रीय महामार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्याने बस नियंत्रणाबाहेर गेली. यावेळी स्‍थानिक पोलिस आणि भारतीय लष्‍कराच्या जवानांनी मोठ्या खुबीने या बसवर नियंत्रण मिळ वले. ही बस अमरनाथहून परतत होती. ही बस पंजाबच्या हाशियारपूरला निघाली होती. या दरम्‍यान या बसचा ब्रेक फेल झाला. त्‍यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. जवानांनी प्रसंगावधान दाखवत हुशारीने बसवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अपघात टळला.

बसमध्ये ४० प्रवासी, १० जण जखमी

भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्‍मू काश्मीर पोलिसांसोबत NH-44 वर बसला एका मोठ्या अपघातापासून वाचवले. ही बस अमरनाथहून पंजाबच्या होशियारपूरला जात होती. या दरम्‍यान बसचा ब्रेक फेल झाला होता. भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्‍मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून बसच्या वेगावर नियंत्रण मिळवले. या बसच्या टायरखाली दगडे टाकून बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यामध्ये त्‍यांना यश आले. मोठ्या प्रयत्‍नानंतर अखेर बसवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ज्‍यामुळे नाल्‍यात कोसळण्यापासून बसला रोखता आले.

या बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते. जेंव्हा बसमधील प्रवाशांना समजले की, बसचा ब्रेक फेल झाला आहे, तेंव्हा अनेक प्रवाशांना धक्‍का बसला. यावेळी घाबरलेले प्रवासी बसमध्येच पळापळ करू लागले. ज्‍यामध्ये अनेक लोक जखमी झाले. जखमी प्रवाशांमध्ये सहा पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तर काही प्रवाशांनी चालु बसमधूनच उड्या मारल्‍या, यामुळे ते जखमी झाले.

सैन्याच्या क्‍विक रिॲक्‍शन टीमची मदत

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये ४० यात्रेकरू बसले होते. बस बनिहालच्या जवळ पोहोचल्‍यावर बसचा ब्रेक फेल झाल्‍याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी सैन्याची क्‍वि रिॲक्‍शन टीम ॲम्‍ब्‍युलन्ससोबत घटनास्‍थळी पोहोचली आणि सर्व जखमींना तात्‍काळ मदत दिली.

अनेक प्रवाशी झाले जखमी

सर्व जखमी लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्‍या असून, ज्‍यांना दुखापत झाली आहे. त्‍यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्‍यान यावेळी अनेक प्रवाशांनी बसचा ब्रेक फेल झाल्‍याचे लक्षात येताच घाबरून बसमधून उड्या मारल्‍या. यामुळे अनेकजण रस्‍त्‍यावर पडून गंभीर जखमी झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news