Raigad News : विहिरीत मायलेकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ही घटना शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.
Raigad News
Raigad News : विहिरीत मायलेकाचा मृतदेह आढळल्याने खळबळfile photo
Published on: 
Updated on: 

Raigad News: Sensation as bodies of mother and son found in a well

कोलाड : विश्वास निकम रोहा तालुक्यातील सुतारवाडी नजीक असलेल्या खिल्लारे फार्म हाऊसवर असणाऱ्या विहिरीच्या पाण्यात बुडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या दुर्देवी घटनेत मनिषा भगवान काशिकर (वय ८० वर्षे) आणि त्यांचा मुलगा मंदार भगवान काशिकर (वय ४३ वर्षे, मूळ रा. सर्वे नं. ७/८/९, पांडव सदन, लेन नं. शिवाजी नगर, पुणे; सध्या रा. खिल्लारे फार्म हाऊस, सुतारवाडी, पो. जामगाव, ता. रोहा) या मायलेकाचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Raigad News
Panvel Earthquake : पनवेल तालुक्यात नानोशी येथे २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का

​मिळालेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील मौजे जामगाव हद्दीतील सुतारवाडी येथे अमित सुदाम खिल्लारे यांच्या मालकीचे फार्म हाऊस असून मयत मनिषा काशिकर व त्यांचा मुलगा मंदार या ठिकाणी राहत होते. शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.३० ते ९.३० च्या सुमारास फार्म हाऊस परिसरातील विहिरीच्या पाण्यात मनीषा काशिकर यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दरम्यान, विहिरीच्या काठावर महिला व पुरुषाच्या चपला आढळून आल्याने महिलेचा मुलगा मंदार हादेखील विहिरीत पडला असावा अथवा त्यानेही उडी घेतली असावी असा संशय उपस्थित झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून फार्म हाऊसवरील संतोष तुकाराम मार्कडे यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

​घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी 'सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थे'च्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले. रेस्क्यू पथकाने घटना स्थळी दाखल होऊन विहिरीत तरंगत असलेला मनिषा काशिकर यांचा मृतदेह बाहेर काढला.त्यानंतर शोध मोहीम सुरु करून पाण्यात बुडालेला मंदार काशिकर यांचा मृतदेह ही बाहेर काढला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह पुढील तपासणी व उपचारासाठी रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले.

Raigad News
Samruddhi Expressway: कोकणचा चेहरामोहरा बदलणार! समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडणार; ११ हजार कोटींचा प्रकल्प

​घटनेची भीषणता पाहता रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळे तसेच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. असून कोलाड पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये पाण्यात बुडून मृत्यूची झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भोजकर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news