Panvel Earthquake : पनवेल तालुक्यात नानोशी येथे २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का

भूकंपाची तीव्रता कमी असल्याने परिसरात हानी नाही
Panvel Earthquake : पनवेल तालुक्यात नानोशी येथे २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का
Panvel Earthquake : पनवेल तालुक्यात नानोशी येथे २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का
Published on: 
Updated on: 

पनवेल ; पनवेल तालुक्यातील मौजे नानोशी गाव परिसरात आज (३ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची खोली सुमारे ५ किलोमीटर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू नानोशी, ता. पनवेल, जि. रायगड परिसरात असल्याचे उपलब्ध माहितीतून समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने परिसरात कोणतीही मोठी हालचाल किंवा नुकसान झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवित अथवा वित्तहानीची नोंद झालेली नाही, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार, पनवेल यांनी दिली आहे. भूकंपाची नोंद झाल्यानंतर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

भूकंपाची नोंद :

* ठिकाण : नानोशी, पनवेल

* तीव्रता : २.६ मॅग्निट्यूड

* वेळ : सायंकाळी ६.३२ वा.

* खोली : ५ किमी

* नुकसान : कोणतीही नोंद नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news