Samruddhi Expressway: कोकणचा चेहरामोहरा बदलणार! समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडणार; ११ हजार कोटींचा प्रकल्प

१०४.८९ किमीच्या भरवीर-वाढवण एक्सप्रेसवेची आखणी; सुमारे ११ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि सर्वेक्षण सुरू
Samruddhi Expressway
Samruddhi ExpresswayPudhari
Published on: 
Updated on: 

रायगड: महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यभरात महामार्ग, सागरी रस्ते आणि बंदरांचे जाळे विणले जात आहे. समृद्धी महामार्ग थेट कोकण किनारपट्टी आणि पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराशी जोडून राज्याच्या आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग तयार केला जात आहे. या नेटवर्कमुळे काेकणचा चेहरामाेहराच बदलून जाणार आहे.

नागपूर ते मुंबई (आमणे) जोडणारा ७०१ किमी लांबीचा मुख्य समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे. या महामार्गाला पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराशी थेट जोडण्यासाठी १०४.८९ किमी लांबीच्या भरवीर-वाढवण एक्सप्रेसवेची आखणी करण्यात आली आहे. सुमारे ११,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सध्या भूसंपादन आणि सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे.

यासोबतच मुंबई-नाशिक महामार्गावरील आमणे ते वडपे दरम्यानच्या रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ठाण्यातील आमणे येथे समाप्त होत असून, तेथून पुढे कल्याण-तळोजा रिंग रोड आणि 'मल्टी मॉडेल कॉरिडोअर'द्वारे हा मार्ग थेट रायगड जिल्ह्यातील जेएनपीए पोर्ट, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी जोडला जाणार आहे.

Samruddhi Expressway
Maharashtra Monsoon Exit: दुष्काळ मागे ठेवून मान्‍सून परत निघाला! आला उशिरा, निघाला मात्र लवकरच

याशिवाय, नाशिकमधील भरवीर ते पालघरमधील वाढवण बंदर अशा १०४.८९ किमीच्या जोडमार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातून थेट कोकण किनारपट्टी आणि बंदरांपर्यंत मालवाहतूक विनाअडथळा शक्य होणार आहे. तसेच मुंबई अटल सेतू आणि प्रस्तावित वर्सोवा-विरार कोस्टल रोडमुळे समृद्धीवरून येणारी वाहतूक थेट रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर उतरून संपूर्ण कोकणाशी जोडली जाईल.

Samruddhi Expressway
Virat Garjana Morcha: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज ठाकरे बंधूंचा मोर्चा; काँग्रेस आणि शरद पवार गटाचाही पाठिंबा

सुमारे ७६,२२० कोटी रुपये खर्चाचा वाढवण बंदर प्रकल्प जगातील अव्वल १० बंदरांमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने विकसित केला जात आहे. २३.२ दशलक्ष टीईयूएस माल हाताळण्याची प्रचंड क्षमता असलेल्या या बंदरासाठी २२,३२३ कोटी रुपयांच्या ऑफ-शोअर टेंडर प्रक्रियेला गती मिळालेली आहे.

या पहिल्या टप्प्याचे काम २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रायगडमधील रेवस ते सिंधुदुर्गातील रेड्डी दरम्यानचा हा ५०० किमीहून अधिक लांबीचा सागरी महामार्ग (एमएसएच-४) सुमारे २७,००० कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. या मार्गातील महत्त्वाचा भाग म्हणजे विविध खाड्यांवर बांधले जाणारे १४ मोठे पूल आहेत. सध्या आग्राव, बाणकोट आणि जयगड खाड्यांवरील पुलांची कामे वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहेत. हे सर्व पूल पूर्ण करून २०२९-३० पर्यंत संपूर्ण महामार्ग अखंड वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

मुंबई ते सिंधुदुर्ग ५ तासांत : प्रवासाच्या वेळेत मोठी बचत

मुंबईतील कोस्टल रोड आणि अटल सेतू (MTHL) मुळे किनारपट्टीवरील वाहतुकीला नवी दिशा मिळाली आहे. अटल सेतूपुढे रेवस जोडमार्गाने सागरी महामार्गाला जोडण्याचे काम आखण्यात आले असून, दुसरीकडे वर्सोवा-विरार कोस्टल रोडच्या माध्यमातून हा मार्ग पुढे वाढवण बंदरापर्यंत जोडला जाणार आहे. हे सर्व सागरी जोडमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास सध्याच्या १०-१२ तासांवरून अवघ्या ५ ते ६ तासांवर येणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news