Raival Mango Demand : रायवळ आंब्यांची प्रतीक्षा

अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम
Raival Mango Demand
Raival Mango Demandpudhari photo
Published on
Updated on

सुधागड ः संतोष उतेकर

कोकणातील खास वैशिष्ट्य मानला जाणारा रायगड आंबा यंदा बाजारात कमी प्रमाणात दाखल होत असल्याने ग्राहकांची प्रतीक्षा वाढली आहे. अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे भाव घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र प्रत्यक्षात उत्पादन घटल्याने आंब्याचे भाव अजूनही तेजीत कायम असून रायवळ आंब्यांना विशेष मागणी असल्याचे चित्र आहे.

सुधागड तालुक्यातील परली जांभूळपाडा, ढोक शेत गोमाशी फणसवाडी तसेच अलिबाग तालुक्यातील चोळून व्हावे या भागामधून पूर्वी मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर आंब्याची आवक होत असे, या भागातील आंबा चव सुगंध आणि रसाळपणासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे स्थानिकांसह मुंबई पुण्यातील चाकरमानी आणि पर्यंतकांमध्येही रायवळ आंब्याला मोठी मागणी असते.

Raival Mango Demand
Mango price hike: आवक घटल्याने आंब्याचे दर वाढले

गेल्या काही वर्षात आलेल्या निसर्ग आणि चौक ते चक्रीवादळामुळे रायवळ आंब्याची जुनी झाडे उमलून पडली तर काही ठिकाणी झाडांची तोड झाल्याने रायगड आंब्याच्या अनेक जाती या भागातून नाहीशा झालेल्या दिसतात त्याचा परिणाम अद्यापही उत्पादनावर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Raival Mango Demand
Pune Hapus Mango Price Drop: हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण; पुणे बाजारात आवक वाढली

आकर्षक प्रकार शेंद्रा आंबा लालसर पिवल्या रंगाचा आकर्षक आणि गोड चवीचा केळी आंबा आकाराने लांबट पोळीसारखा दिसणारा खोबरा आंबा गर घट्ट व खोबऱ्यासारखा पोत असलेला पिठोळी बिबट्या आंबा लहान आकाराचा रसाळ आणि सुगंधी लोधा आंबा जाड रस व मोठ्या आकाराचा गावठी प्रकार तोरणा आंबा पारंपारिक पारंपारिक कोकणी जाती पैकी प्रकार भोसरी आंबा गरार केसरी छटा आणि गोडवा जास्त साखरी आंबा नावाप्रमाणे अतिशय गोड चव असतो.

बाजारात हापूस आंब्याची मागणी मागील काही दिवसांपासून अचानक वाढल्याने भाव खूपच कमी झाला तर आवक मर्यादित असल्याने रायवळ आंब्याचे भाव अजूनही चांगले मिळत आहेत अनेक ग्राहकाकडून ड्रायव्हर आंब्याची चौकशी होत असली तरी अपेक्षित प्रमाणात माळ उपलब्ध होत नसल्याने सांगावे लागते.

वैभव उतेकर, आंबा विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news