Mahad Municipal Council | मुख्याधिकाऱ्यांना दालनात घुसून मारहाण; भाजप नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा

महाड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा निषेध, कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा
Mahad Chief Officer Assaulted
महाड नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाPudhari
Published on
Updated on

Mahad Chief Officer Assaulted

महाड : महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून मारहाण केली. या प्रकरणी प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महाड शहरात खळबळ उडाली असून नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर (वय ४९) हे बुधवारी (दि. ८) दुपारी सुमारे १.५० वाजता आपल्या दालनात शासकीय कामकाज करत असताना तिन्ही आरोपी तेथे आले. प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Mahad Chief Officer Assaulted
Mahad Python Rescued | महाड तहसील कार्यालय परिसरातील अजगराला सर्पमित्रांकडून जीवदान

यानंतर तिघांनी संगनमत करून मुख्याधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, राकेश पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या डाव्या गालावर थप्पड मारून कमरेवर लाथ मारली तसेच शिवीगाळ केली. नगरसेवक सूरज बामणे यांनी हातातील छत्रीने मुख्याधिकाऱ्यांच्या डोक्यावर वारंवार प्रहार केल्याचा आरोप आहे. तर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने मुख्याधिकाऱ्यांची कॉलर पकडून छाती व पाठीवर हाताबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत.

Mahad Chief Officer Assaulted
Mahad Tree Collapse | गोंडाळे गौळवाडी शाळेच्या आवारातील चिंचेचे झाड कोसळले; किचन शेडचे मोठे नुकसान

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा महाड नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news