Mahad Python Rescued | महाड तहसील कार्यालय परिसरातील अजगराला सर्पमित्रांकडून जीवदान

पूरस्थितीमुळे महाड तहसील कार्यालयाच्या परिसरात भला मोठा अजगर आढळून आला
Mahad Tehsil Office Python Rescued
Mahad Tehsil Office Python RescuedPudhari
Published on
Updated on

Mahad Tehsil Office Python Rescued

महाड : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पूरस्थितीमुळे महाड तहसील कार्यालयाच्या परिसरात आलेल्या पाण्यात आज एक भला मोठा अजगर आढळून आला. तहसील कार्यालयातील कर्मचारी विनोद यांनी याची माहिती तातडीने सिस्केप संस्थेच्या सर्पमित्रांना दिली.

माहिती मिळताच सिस्केप संस्थेचे सदस्य श्रद्धा जोशी, साहिल पानावकर, विराज पाटील, प्रसाद देवरुखकर, अथर्व शिंदे, स्मरण शिंदे आणि ओम शिंदे घटनास्थळी दाखल झाले. अजगर पाण्याच्या टाकीत शिरून बसला असल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.

Mahad Tehsil Office Python Rescued
Mahad Tree Collapse | गोंडाळे गौळवाडी शाळेच्या आवारातील चिंचेचे झाड कोसळले; किचन शेडचे मोठे नुकसान

Mahadस्नेक स्टिक आणि स्नेक बॅगच्या साहाय्याने सर्पमित्रांनी अजगराला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या पकडले. या वेळी स्मरण शिंदे यांनी उपस्थितांना सर्पांविषयी आवश्यक माहिती देत योग्य मार्गदर्शन केले.

बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. सिस्केप संस्थेच्या या तत्पर आणि धाडसी कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news