

रायगड : यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर अशा पाच महिन्यांच्या कालावधीत पावसाने वेगवगळ्या वेळी केलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल 1130 गावांतील 14 हजार 774 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेे आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या एकूण 4 हजार 375 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे 33 टक्के पेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसान भरपाई करिता कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार 3 कोटी 80 लाख 27 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासना पाठविण्यात आला आहे. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बियाणे भिजून नुकसान झाले, परिणामी पेरण्या व लावण्या देखील लांबल्या होत्या. त्यानंतर पेरण्या होवून लावण्या झाल्यावर झालेल्या अतिवृष्टीने पहिला फटका दिला. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात जिल्ह्यातील 190 गावांतील 1 हजार 427 शेतकऱ्यांच्या 197 हेक्टरावरील भात पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीच्या प्रतिपुर्तीसाठी 24 लाख 57 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईच्या निधीचा मागणी शासनाकडे करण्यात आली.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पून्हा झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील 529 गावांतील 8 हजार 391 शेतकऱ्यांच्या 2 हजार 710 हेक्टर क्षेत्रावरील भातपीकाचे नुकसान झाले. याच्या नुकसान भरपाई करिता 2 कोटी 31 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला आहे.
दरम्यान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 1 ऑक्टोबर पासून ऐन दिवाळी सणाला भाक पिक कापणीला आले असताना झालेल्या अतिवृष्टीने उभे तयार भात पिक शेतात पूर्णपणे आडवू होवून भात पिकाची नुकसानी झाली. हातातोंडाशी आलेला घासच पावसाने हिरवून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात आता पर्यंत जिल्ह्यातील 411 गावांतील नुकसानीचे पंचनामे झाले असून, त्यानुसार जिल्ह्यातील 4 हजार 956 शेतकऱ्यांच्या 1 हजार 467 हेक्टरावरील भात पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई करिता 1 कोटी 24 लाख 31 हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे.
जून महिन्यात झालेल्या भात पिक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून त्यापूढील टप्प्यातील नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाकडून कधी येणार याकडे नुकसानग्रस्त शेतकरी डोळे लावून बसले आहे.
शेती नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. जिल्हा प्रशासनाकडू नुकसान भरपाई करिताच्ो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. लवकरच हा निधी जिल्ह्यास प्राप्त होईल. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.
वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,रायगड