Raigad Illegal Fishing : मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

काशिद समुद्रात एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त
Raigad Illegal Fishing
Raigad Illegal Fishingpudhari photo
Published on: 
Updated on: 

उरण : राजकुमार भगत

रायगड जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत आणि अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने काशिद समोरील जलधि-क्षेत्रात धडक कारवाई करत दोन मासेमारी नौका जप्त केल्या आहेत. ९ नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबर रोजी गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या नौकांवरून मोठ्या प्रमाणात एलईडी दिवे आणि जनरेटर हस्तगत करण्यात आले आहेत.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रखर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने समुद्रात सापळा रचून ही मोहीम फत्ते केली. या कारवाईत दिघी येथील नामदेव महादेव कावळे यांच्या मालकीची 'साईरत्न' ही नौका आणि अलिबाग कोळीवाडा येथील हितेंद्र नरेश डबरी यांच्या मालकीची एक विनानोंदणीकृत नौका ताब्यात घेण्यात आली.

Raigad Illegal Fishing
Agri Community Mass Wedding : आगरी समाजाचा ऐतिहासिक निर्णय; प्रत्येक जोडप्याला एक लाखांची भेट !

'साईरत्न' नौकेवरून ८ एलईडी फोकस, ३ पाण्याखालील दिवे आणि १ जनरेटर, तर विनानोंदणीकृत नौकेवरून १७ एलईडी फोकस, २ पाण्याखालील दिवे, ३ सायन लाईट आणि १ जनरेटर असा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.

मत्स्यव्यवसाय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (योजना), सहआयुक्त आणि रायगड-अलिबागचे सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शना खाली मुरुड-जंजिरा येथील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणे यांनी ही कारवाई पार पाडली.

दरम्यान जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य अलिबाग येथील सहायक आयुक्त कार्यालयात जमा करण्यात आले असून, दोन्ही नौका रेवदंडा येथील जेट्टीवर आणून ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित नौकामालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Raigad Illegal Fishing
IRF Ban Extended : झाकीर नाईकच्या संघटनेवरील बंदी पाच वर्षांनी वाढवली !

मत्स्यसंपत्तीचे नुकसान करणाऱ्या या बेकायदेशीर प्रकारां विरोधात जिल्ह्याच्या सागरी हद्दीत नियमित गस्त सुरूच राहील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.