Agri Community Mass Wedding : आगरी समाजाचा ऐतिहासिक निर्णय; प्रत्येक जोडप्याला एक लाखांची भेट !

लग्नासाठी जमीन विकू नका, कर्ज काढू नका; सामुदायिक विवाहातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श
Agri Community Mass Wedding
Agri Community Mass Weddingpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : डोंबिवलीतील आगरी समाजाने समाज प्रबोधनाच्या दिशेने एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही आगरी वधू/वर सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा आयोजित करण्यासंदर्भात शनिवारी सायंकाळी ५ वाजता सांगाव येथील पिंपळेश्वर मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आगरी बंधू /भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लग्न धुमधडाक्यात आणि मोफत करून प्रत्येक जोडप्याला १ लाख रुपयांची भेट सुद्धा देण्यात येणार आहे. लग्नासाठी जमीन विकू नका, कर्ज काढू नका, अनाठायी खर्च करू नका, सामुदायिक विवाह सोहळ्याचा पर्याय स्वीकारा, समाज प्रबोधनाच्या चळवळीला साथ द्या, अशी साद घालण्यात आली आहे.

Agri Community Mass Wedding
Al Nino Impact on Birds : 'अल्‌ निनो'चा परदेशी पाहुण्यांना फटका

आजच्या काळात लस म्हटले की लाखो रूपयांचा खर्च, कर्जाचा डोंगर, जमीन विकण्याची वेळ, दाग/दागिने, मंडप, जेवण यात सामान्य कुटुंब अक्षरशः पिचून जात आहे. अनेक कुटुंबे लग्नाच्या खर्चामुळे आयुष्यभर कर्जाच्या ओझ्याखाली दबली जातात. हीच वेदनादायी परिस्थिती बदलण्यासाठी आगरी समाज प्रबोधन संस्थेने सामुदायिक विवाहाचा हा भव्य पर्याय समाजासमोर ठेवला आहे.

एकाच मंडपात, एकाच मुहूर्तावर, समाजाच्या साक्षीने, धुमधडाक्यात पण खर्चाशिवाय लग्न होणार आणि त्यातही प्रत्येक जोडप्याला १ लाख रूपयांची भेट मिळणार, ही घोषणा म्हणजे समाजासाठी खरेच एक वरदानच ठरत आहे.

Agri Community Mass Wedding
IRF Ban Extended : झाकीर नाईकच्या संघटनेवरील बंदी पाच वर्षांनी वाढवली !
  • या सोहळ्यामुळे केवळ पैशांची बचत होणार नाही तर समाजात एकोपा, बंधुभाव आणि प्रबोधनाची नवी लाट निर्माण होणार आहे. गरीब असो वा श्रीमंत, सर्व जोडपी एकाच व्यासपीठावर, समान सन्मानाने लग्नबंधनात अडकणार, हाच खरा समाज प्रबोधनाचा अर्थ आहे. त्यामुळे आगरी बंधू /भगिनींनी या चळवळीत सामील होऊन आपल्या मुला/मुलींचे भविष्य कर्जमुक्त करावे, असे आवाहन संस्थेचे कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.