उरण; पुढारी वृत्तसेवा : जेएनपीटी बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदराकडे बेकायदा रक्तचंदन घेऊन निघालेला कंटेनर सीमा शुल्क विभागाने परत मागिवला. या कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. ही कारवाई जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या 'सीआययू'ने केली.
जेएनपीटी बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनर बाबत सीमा शुल्क विभागाला संशय आला होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला होता. दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनरची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन असल्याचे आढळून आहे. दरम्यान, जेएनपीटी बंदरातून निर्यात होणार्या कंटेनरमधील मालाची तपासणी होत नसल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वीच उरण परिसरातील सीएमएस गोदामातून अशाच प्रकारे सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू होता. यावेळी मिळालेल्या माहितीवरून सीमा शुल्क विभागाने दुबईला रवाना झालेला संशयित कंटेनर परत मागविला होता. या कंटेनरमध्ये बेकायदा रक्तचंदन असल्याचे आढळून आले. त्यानंतर रक्तचंदन जप्त करण्यात आले.
हेही वाचलंत का ?