कोल्हापूर: कसबा बावडा येथे कोयत्याने गळा चिरून महिलेचा खून, पाेलिसांनी पाठलाग करुन मारेकर्‍यास केले जेरबंद | पुढारी

कोल्हापूर: कसबा बावडा येथे कोयत्याने गळा चिरून महिलेचा खून, पाेलिसांनी पाठलाग करुन मारेकर्‍यास केले जेरबंद

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : धारदार कोयत्याने गळा चिरून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.२) दुपारी कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे घडली. खुनानंतर मारेकरी पसार झाला. त्‍याला पाेलिसांनी पाठलाग करुन ताराराणी चाैकात जेरबंद केले आहे.  वरिष्ठ अधिकारीसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली हाेती. कविता प्रमाेद जाधव (वय ४४, रा. तारळे ता. राधानगरी. जि. काेल्‍हापूर ) असे खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे. राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीनगर, कसबा बावडा )  असे संशयित आराेपीचे नाव आहे.

आज दुपारी ३ ते ४ च्या सुमारास कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे राकेश संकपाळ याने कविता जाधव यांच्‍यावर धारदार कोयत्याने वार केले. कोयत्याने गळा चिरून त्‍यांचा खून केला. यानंतर ताे घटनास्‍थळावरुन पसार झाला.  एलसीबीचे पोलीस अधिकारी किरण भोसले यांनी पाठलाग करुन  ताराराणी पुतळा येथे राकेश संकपाळ याला जेरबंद केले.  त्याने गुन्‍ह्याची कबुली दिली आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Back to top button