Raigad rain update : कुडपणमध्ये पावसाचा कहर; रस्ता खचल्याने एसटी वाहतूक ठप्प, अनेक घरांचे नुकसान

मातीचा ओसरा आल्याने भीतीचे वातावरण
Raigad rain update : कुडपणमध्ये पावसाचा कहर; रस्ता खचल्याने एसटी वाहतूक ठप्प, अनेक घरांचे नुकसान
Published on
Updated on

पोलादपूर : तालुक्यातील कुडपण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून कुडपण–पोलादपूर एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुडपण खुर्द येथे रस्ता खचल्यामुळे एसटी बस पुढे जाऊ शकली नाही आणि ती तेथेच अडकून उभी आहे.

संततधार आणि मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याची झालेली गंभीर अवस्था आणि वाहतूक बंद झाल्यामुळे गावाचा संपर्क विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Raigad rain update : कुडपणमध्ये पावसाचा कहर; रस्ता खचल्याने एसटी वाहतूक ठप्प, अनेक घरांचे नुकसान
Sambhajinagar Rain : शहरात मुसळधार : ३९ मिमीपेक्षा अधिक पाऊस

परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करून बाधित कुटुंबांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Raigad rain update : कुडपणमध्ये पावसाचा कहर; रस्ता खचल्याने एसटी वाहतूक ठप्प, अनेक घरांचे नुकसान
Palghar power outage : विजेच्या तारेवर झाड कोसळून दोन खांब जमीनदोस्त; दोन दिवसांपासून ग्रामस्थ अंधारात

सध्या मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासन मार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गावातील परिस्थिती लक्षात घेता, जेवढ्या व्यक्ती आणि संस्थांना शक्य होईल त्यांनी संकटग्रस्त ग्रामस्थांना मदत व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news