Cyber Crime Raigad : मालकाच्या नावाने मेसेज; कंपनीला ६२ लाखांचा गंडा

बनावट व्हॉट्सॲप संदेशाद्वारे खात्यात पैसे वळविल्याचा आरोप; बेलापूर लॉजिस्टिक कंपनीत प्रकार
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : कंपनीच्या मालकाचा फोटो व नाव वापरून अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवत तब्बल ६२ लाख रुपये परस्पर सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये वळवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बेलापूर परिसरातील एका लॉजिस्टिक कंपनीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीतील कर्मचाऱ्याने सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून, अनोळखी व्यक्तींविरोधात फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बेलापूर येथील कार्गो मुव्हर्स अँड लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीत तक्रारदार अमोल पाटील हे २०१९ पासून नोकरीस असून अकाउंटचे काम पाहतात. त्यांच्यासोबत शितल पवार आणि श्वेताली कुंटे या अकाउंट विभागातील कर्मचारी काम करतात. कंपनीचे मूळ मालक ए.जी. जार्ज हे परदेशात वास्तव्यास असून, ते काही कालावधीनंतर कंपनीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी येतात.

Cyber Crime
Pimpri Chinchwad Cyber Crime: येरवडा कारागृहात ‘सायबर’ कट; बँक खाती पुरवून ८६ लाखांची फसवणूक, बीएएमएस विद्यार्थ्यासह दोघे अटकेत

१९ ऑगस्ट रोजी पहिला प्रकार घडला. कंपनीच्या अकाउंट विभागातील शितल पवार यांना मालक जार्ज यांच्या नावाने आणि त्यांच्या फोटोसह असलेल्या व्हॉट्सॲप खात्यावरून कंपनीच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर एका इंडसइंड बँक खात्यावर ९५ लाख रुपये पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र कंपनीच्या दैनंदिन व्यवहाराची मर्यादा ५० लाख रुपये असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर ३० लाख रुपयांचा व्यवहार करण्यास सांगण्यात आल्याने कंपनीच्या खात्यातून रक्कम पाठविण्यात आली.

Cyber Crime
Cyber Crime | डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणी गोव्याच्या ईडीची मोठी कारवाई; मुंबईतून दोघांना ठोकल्या बेड्या!

यानंतर ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा ३२ लाख रुपये पाठविण्याचे निर्देश त्याच व्हॉट्सॲप खात्यावरून देण्यात आले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे सांगितल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पगार करण्याचे आश्वासन देत रक्कम पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कंपनीच्या खात्यातून ३२ लाख रुपये संबंधित खात्यात वर्ग करण्यात आले. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी कंपनीतील अन्य कर्मचाऱ्यांनी या व्यवहाराबाबत मालक जार्ज यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण कोणतेही पैसे पाठविण्यास सांगितले नसल्याचे जार्ज यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला.

Cyber Crime
Jalgaon cyber crime : टूर अँड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली २.१५ कोटींचे सायबर राकेट; मुंबईच्या 'टोनी'ला ११ खाती विकणारा एजंट जळगावातून गजाआड

यानंतर कंपनीचे बँक स्टेटमेंट तपासले असता, ज्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्यात आले होते, ती खाती कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांची नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने तत्काळ बँकेशी संपर्क साधून सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर तक्रार केली. तसेच राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरही तक्रार नोंदविण्यात आली आहे. मालकाचा फोटो व नाव वापरून विश्वास संपादन करून कंपनीच्या खात्यातून पैसे वळवून घेतल्याने हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित बँक खाती, व्हॉट्सॲप संदेश आणि व्यवहारांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news