Beef Smuggling Raigad: रायगडमध्ये ९०० किलो गोमांस जप्त; एक्सप्रेसवेवर स्कॉर्पिओ पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

खालापूर पोलिसांची सावरोली टोलनाक्यावर कारवाई; गोवंश चोरी-कत्तलीच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात संतापाची लाट
Police
Police Pudhari
Published on
Updated on

खोपोली : शिर्डी श्रीरामपुरवरून मुंबईकडे एक्सप्रेसवरून अंदाजे 900 किलो वजनाचा गोमांस घेवून जाणारी स्कार्पिओ कार गोररक्षकांच्या मदतीने खालापूर पोलिसांनी पकडली आहे.ही कारवाई शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान केली आहे.गोमांस तस्क्रीच्या घटनेने सर्व संताप व्यक्त होत असताना खालापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Police
Hind Di Chadar Panvel: पनवेलमध्ये ‘हिंद दी चादर’ सोहळ्यासाठी भव्य तयारी; 26 लाख पाण्याच्या बाटल्या, 850 आरोग्य कर्मचारी तैनात

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी श्रीरामपुरवरून रात्री 2 वाजता मुंबईकडे गोमांस घेवून निघाल्याची माहिती पोलिसांना माहीती मिळाल्यानंतर खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांच्या मदतीने सावरोली टोल नाक्यावर सापळा रचनाण्यात आला होता.

Police
Hind Di Chadar Panvel: पनवेलमध्ये ‘हिंद दी चादर’ सोहळ्यासाठी भव्य तयारी; 26 लाख पाण्याच्या बाटल्या, 850 आरोग्य कर्मचारी तैनात

पहाटे 6 वाजता गोमांस घेऊन जाणारी आलिशान कार स्कार्पिओ क्रमांक एम.एच.55 बी.7555 हिच्या मागोमाग गोरक्षक व विश्व हिंदू परिषदेचे सुनील पाटील सचिन पाताळे व गोरक्षक यांनी खालापूर टोल नाक्यावर आल्यावर ही गाडी थांबवून याची खालापूर पोलिसांच्या मदतीने गोवन सुरक्षा समिती खालापूर यांच्यासमोर तपासणी केली असता यात जवळपास अंदाजे 900 किलो गुरांचे मास आढळून आले. त्यामुळे तात्काळ खालापूर पोलिसांनी ही स्कार्पिओ व त्यातील दोन जणांना खालापूर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरू केली असता सदरचा गोमास शिर्डी श्रीरामपूर येथून रात्रीच्या दरम्यान एक्सप्रेस वे मार्गे गोवंडी मुंबईकडे घेऊन निघालो असल्याचे कबूल केले त्यामुळे स्कार्पिओ कारसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुलेमान कुरेशी मुख्य टोळी प्रमुख गोवंडी आहे अशी माहिती समोर आली आहे.

Police
Ayushman Bharat Scheme: एमएमआरमध्ये आयुष्मान भारतला दार बंद? नामांकित रुग्णालयांचा उपचारांना नकार

या घटनेमुळे खालापूर तालुक्यात तीव्र निषेधाची भावना व्यक्त होत आहे सदरचा गुरांचा मास खालापूर पोलिसांनी दफन केलेला आहे अशी माहिती खालापूर पोलिसांनी दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.या कारवाई गोरक्षक सुनील पाटील,सचिन पताळे आणि गोवंश सुरक्षा समिती खालापूर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

Police
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 36 तासांच्या कोंडीवर विधानसभेत चर्चा; आपत्कालीन एसओपी तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, रायगड जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची चोरी आणि त्यांच्या कत्तल करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरे चोरी होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. चोरी आणि कत्तलीच्या घटना उघडकीस येऊन या घटना थांबलेल्या नाहीत. तर काही ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे जिल्हयातील गोवंश चोरी आणि कत्तलीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news