

महाड, पुढारी वृत्तसेवा : राजेवाडी येथे गुरुवारी झालेल्या गोहत्येच्या दोन घटनेच्या पार्श्वभूमीवर महाड शहरामध्ये आज (दि.१) पोलीस प्रशासनामार्फत दंगल विरोधी पथक तैनात केले आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरातून पोलिसांनी मॉकड्रील काढण्यात आला.
महाड तालुक्यातील राजेवाडी येथे झालेल्या गोवंश हत्या व मारहाण प्रकरणी गुरुवारी महाड शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. या घटनेदरम्यान आरोपींकडून गोरक्षक तसे पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गोसेवकांनी व हिंदुत्ववादी संघटनानी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.
पोलीस प्रशासनाने जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले असताना देखील जमाव काही ठिकाणी प्रक्षोभक होत असल्याचे निदर्शनास येताच परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना जमावावर प्रसंगी सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. या सर्व प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार, धार्मिक व जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी महाड शहरात अनिश्चित काळासाठी दंगल विरोधी पथक तैनात केले आहे.
हेही वाचा