Raigad accident : राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात; बलेनो कारची उभ्या ट्रेलरला धडक, दोघे गंभीर

जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्यात आले आहे
Raigad accident : राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात; बलेनो कारची उभ्या ट्रेलरला धडक, दोघे गंभीर
Published on
Updated on

महेंद्र माने

नागोठणे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील सुकेळी गावच्या हद्दीत जिंदाल कंपनीसमोर सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून बलेनो कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Raigad accident : राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात; बलेनो कारची उभ्या ट्रेलरला धडक, दोघे गंभीर
Raigad Industrial Gas Leak Accidents: रायगड जिल्ह्यात रासायनीक वायू गळतीच्या घटनांमध्ये वाढ; सहा वर्षांत ३५ मृत्यू तर १५० बाधीत

मिळालेल्या माहितीनुसार, चालक जयदीप दीपक महाडिक (वय 36, रा. बोरीचा माळ, ता. तळा, जि. रायगड) हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार क्रमांक MH 05 FP 6255 ही मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे घेऊन जात होते. सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास जिंदाल कंपनी, सुकेळी येथे आले असता त्यांच्या समोर गोवा बाजूकडे जाणारा टाटा कंपनीचा ट्रेलर क्रमांक MH/46/CL/6349 उभा होता. या ट्रेलरला बलेनो कारची पाठीमागून धडक बसून अपघात झाला.

Raigad accident : राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात; बलेनो कारची उभ्या ट्रेलरला धडक, दोघे गंभीर
Raigad Accident : जेएनपीएत अंगावर कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

या अपघातात बलेनो कारचे चालक जयदीप दीपक महाडिक तसेच कारच्या डाव्या बाजूला बसलेले स्वप्निल सुरेश साळुंखे (वय 32, रा. इंदापूर-माणगाव) यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र वाकणचे ए.एस.आय. भानुदास म्हात्रे, पोलिस कॉन्स्टेबल सत्यवान पिंगळे, मनोहर माळी व राजू पाटील यांच्यासह नागोठणेचे सहा. पो. नि. रविंद्र पारखे, पो. हवालदार महेश रूईकर, प्रशांत घरत व प्रशांत भोईर, पो. कॉन्स्टेबल बळी पुट्टेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Raigad accident : राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात; बलेनो कारची उभ्या ट्रेलरला धडक, दोघे गंभीर
Raigad Road Accident: किल्ले रायगडावरून परतताना शिवभक्तांचा अपघात; दोघे गंभीर

जखमींना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, नागोठणे येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताबाबतची पुढील कारवाई सहा. पो. नि. रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news