

पोलादपूर : रघुनाथ भागवत
पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद च्या शाळेची परिस्थिती दर्जेदार नसली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आजही अनेक शाळा उभ्या आहेत. १४३ शाळा पैकी १२१ शाळा आजही उभ्या आहेत. मात्र या पैकी अनेक शाळा असून नसल्या सारख्या आहेत. १०० पेक्षा जास्त सुरू आलेल्या शाळांमधून चौदाशे पेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. त्यासाठी दोनशे पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत. तालुक्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गवर असल्याने त्याचे संयोजन करणे गरजेचे बनले आहे.
गाव तेथे शाळा या न्यायाने प्रत्येक गावाला शाळा झाली आहे. तालुक्यात १३४ प्राथमिक शाळा होत्या सद्य स्थितीत १०० पेक्षा जास्त शाळा सुरू आहेत. या शाळा मधून हजारो विद्यार्थी आजही अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देण्यासाठी शिक्षक आहेत. तर काही शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी आणि शिक्षक जास्त अशी माहिती भेटी अंती पहावयास मिळाली.
राजिप शाळा मधील पटसंख्या वाढी साठी स्थलांतरित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन, माता- बालक गटांना स्थलांतरीताचे प्रमाण रोखण्यासाठी भेटी देऊन मतपरिवर्तन व शिक्षणाचे महत्व पटवून देणे, लेक शिकवा लेक वाचवा अभियानांतर्गत उपक्रम राबविणे, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबवून जीवन उपयोगी कला शिकविणे, बाल मेळावे राबवत विचार, आचार व विविधतेतून (एकता राबविणे ) व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम राबवून विद्यार्थी विकास करण आदी उपक्रम राबविणे गरजेचे बनले आहे.
पोलादपूरातील काही शाळांमध्ये डिजिटल पद्धत करण्यात आली आहे विविध उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण सह इतर धडे देण्यात येत आहे. परसबागसह फनीवार द्वारे विविध उपक्रम सह तंत्रज्ञान च्या युगातील अभ्यासपर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
दर्जेदार शिक्षणापासून विद्यार्थी दूर
पोलादपूरात शैक्षणिक विकासातसुद्धा प्रगती नाही. पांढरपेशा वर्गातील चार मुले शिक्षण घ्यायची. बाकी निशाणी अंगठा. शिक्षणखात्यानेसुद्धा या तालुक्याकडे जवळजवळ दुर्लक्षच केले असे म्हटले तर वावगे होणार नाही. कोण जाणार ते डोंगर चढायला? जेव्हा उत्तरेकडील शिक्षकांच्या बदल्या या तालुक्यात व्हायच्या तेव्हा असे समजले जायचे की त्या शिक्षकांना शिक्षा म्हणूनच या तालुक्यात पाठविले जायचे. ते खरे असेल तर, त्या शिक्षकावर मानसिक नैराश्य आल्याने तो या भारताच्या भावी आधारस्तंभाना काय शिकविणार? तेव्हा कुडपणसारख्या गावात वाहनाची सोय नव्हती.