Kundalika River Encroachment : कुंडलिकेच्या ब्ल्यू लाईन पात्रात अनधिकृत बांधकाम

नदीतील बांधकाम हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण सुरू
Riverbed Encroachment Protest
Riverbed Encroachment Protest,(छायाचित्र- नितीश सकपाळ)
Published on: 
Updated on: 

​वरसे : ​वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कुंडलिका नदीच्या ब्लू लाईन पात्रात झालेले अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा २६ नोव्हेंबर रोजी दुसरा दिवस आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश रावकर यांनी उपोषण सुरु केले आहे.

येथील अनधिकृत बांधकामाविरोधात ‘कुंडलिका वाचवा कृती समिती’च्या वतीने २५ नोव्हेंबरपासून रोहा तहसील कार्यालय गेटसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी कारवाई न झाल्याने २८ सप्टेंबर रोजी पाटबंधारे विभाग कोलाड येथे आमरण उपोषण करण्यात आले होते.

Riverbed Encroachment Protest
Raigad Farmers Protest : सेझबाधित ४५ गावांतील शेतकऱ्यांचे ‘जवाब दो’आंदोलन

त्या वेळी पाटबंधारे विभाग रायगड आणि नगर रचना रायगड (अलिबाग) यांच्या अहवालातून संबंधित प्लॉट शासनाच्या नॉन-ॲग्रीकल्चर नियमानुसार ‘खुली जागा’ म्हणून राखीव असल्याचे, नदीपात्रातील ब्लू लाईन नियमावलीत येत असल्याचे आणि कोणतीही बांधकाम परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले होते.

जिल्हाधिकारी व तहसीलदार रोहा यांनी दोन दिवसांत बांधकाम काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. ​त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रायगड यांनी पाटबंधारे विभाग कोलाड व तहसील कार्यालयाला आदेश देऊन महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९५६ मधील तरतुदींनुसार हे बांधकाम निष्कासित करण्याचे निर्देश दिले होते.

Riverbed Encroachment Protest
Palghar Liquor Seizure : पालघरमध्ये दमण बनावटीचा मद्यसाठा जप्त

त्यानुसार पाटबंधारे विभागाने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आणि भुवनेश्वर गावाचा प्रमाणित नकाशा सादर करून, हे बांधकाम कुंडलिका नदीच्या ब्लू लाईन नियमावलीत व राखीव खुल्या जागेत अनधिकृतरीत्या केल्याचा अहवाल तहसीलदारांना दिला.

ब्ल्यू लाईनमुळे धोकादायक भागांची ओळख

ब्ल्यू लाईन म्हणजे नदीला येणाऱ्या पुराच्या वेळी पाण्याची संभाव्य कमाल पातळी लक्षात घेऊन निश्चित केलेली पूररेषा होय. या रेषेच्या आतील भागात पुराचा धोका अधिक असतो. जिल्ह्यातील कुंडलिका, सावित्री, अंबा, पाताळगंगा आदी नद्यांना पावसाळ्यात पूर येतो. नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्चित केली जाते. या पूररेषांमुळे धोकादायक भागांची ओळख होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.