Palghar Anganwadi Conditions : केळवे येथील अंगणवाडीची दुरवस्था

शौचालयाला दरवाजा नाही, स्वच्छ पिण्याचे पाणीही नाही
Palghar Anganwadi Conditions
Palghar Anganwadi Conditionspudhari photo
Published on: 
Updated on: 

केळवा रोड : विजय घरत

बालकांच्या शिक्षणाचा, संस्कारांचा आणि आरोग्याचा पाया घडविणाऱ्या केळवे येथील अंगणवाडीची दुरवस्था झाली आहे. आरोग्याचा पाया घडविणाऱ्या जसोडी व मोहपाडा येथील अंगणवाडीची दुरवस्था झाली आली आहे. अंगणवाडीचे छप्पर गळत असून शौचालयाला दरवाजा नाही. शौचालय अस्वच्छ अवस्थेत असून अंगणवाडीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वर्गात बसण्यासाठी चटई नसणे आणि इमारतीला रंगरंगोटी न केल्याने अंगणवाडीच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

लहान बालकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक असताना अंगणवाडीतील या परिस्थितीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालयाला दरवाजा नसल्याने बालकांच्या सुरक्षिततेसह गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शौचालयाची अस्वच्छ अवस्था आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव यामुळे बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Palghar Anganwadi Conditions
Palghar Environmental Issue : सालवडमध्ये रासायनिक अवशेषांच्या प्लास्टिक टाक्यांचा बेकायदा साठा!

अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी चटई नसणे, इमारतीची रंगरंगोटी न होणे आणि छप्पर गळत असणे, या समस्यांकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. बालकांना आनंददायी वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी अंगणवाडीची देखभाल आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

एकीकडे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असताना, दुसरीकडे अंगणवाडीतील मूलभूत सुविधांची अशी दुरवस्था असेल तर बालकांच्या आरोग्य व विकासाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Palghar Anganwadi Conditions
Palghar Protest : संविधान दिनी वाढवण बंदरविरोधी आंदोलनाचा एल्गार

संबंधित विभागाने केळवे येथील अंगणवाडीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गळणाऱ्या छप्पराची दुरुस्ती, शौचालयाला दरवाजा, स्वच्छतेची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्यासाठी चटई आणि इमारतीची रंगरंगोटी करून बालकांना सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.