Poladpur bus stand redevelopment : पुनर्बांधणी पूर्ण होऊनही पोलादपूर बसस्थानकाला लोकार्पणाची प्रतीक्षा

मंत्री भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना सुरु झालेले काम; सव्वादोन कोटींचा निधी खर्च
Poladpur bus stand redevelopment
Poladpur bus stand redevelopmentpudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर : पोलादपूर तालुका आकाराने छोटा असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटकांसाठी पोलादपूर बसस्थानक हे महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. मात्र पोलादपूर बसस्थानकाची अनेक वर्षांपासून असलेली दुरवस्था आता दूर झाली आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून तब्बल २ कोटी २५ लाख रुपये खर्च करून सुसज्ज आणि भव्य बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या हे बसस्थानक अधिकृत लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

पूर्वीचे जुने बस स्थानक अनेक वर्षापासून मोडकळीस आलेले व दुरावस्था झालेले प्रवाशांना गैरसोईचे ठरणारे झाले होते. प्रवासी वर्गाच्या व पोलादपूर तालुक्यातील जनतेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांनी महाराष्ट्र एसटी महामंडळ अध्यक्ष पद त्यांच्याकडे असताना प्राधान्याने प्रथम पोलादपूर बस स्थानक नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आले. सदर बस स्थानक मंजूर आराखड्याप्रमाणे उभारण्याचे काम एस इ चव्हाण कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Poladpur bus stand redevelopment
Vasai Virar stray dogs : वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांचा कहर

रायगड जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर बस स्थानकाची ८ नोव्हेंबर १९७७ रोजी या कोनशीला बसविण्यात आली होती. या ठिकाणी लोकलसह लांब पल्ल्याच्या बसेस थांबत आहेत. शेकडो विद्यार्थीसह हजारो प्रवासी या स्थानकावरील तळ कोकणासह मुंबई, ठाणे, नालासोपारा, अहमदाबादकडे मार्गस्थ होत असताना बाहेरील आगाराच्या बसेस या ठिकाणी चहापाण्यासाठी थांबत. त्यानंतर जुनी कक्ष प्रवास बैठक व्यवस्था उपहारगृह तोडण्यात आहे होते. नव्या धर्तीवर बांधण्यात आले असून लवकर प्रवासी वर्गासाठी ते खुले होणार आहे.

Poladpur bus stand redevelopment
Pandavkada waterfall : पांडवकडा धबधबा ठरतोय मृत्यूचा सापळा

लांब पल्ल्याची गाडी नाही

महाड आगरातून मुंबई, पुणे, नालासोपारा, मुरुड, बोरिवली आदी गाड्या सोडण्यात येतात. मात्र सायंकाळी सातनंतर महाड-पोलादपूरमधून एकही लांब पल्ल्याची गाडी नसल्याने अनेकदा प्रवासी वर्गाला दुसऱ्या आगारच्या बसेसवर अवलंबून प्रवास करावा लागत आहे तर काही वेळ खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news