Pandavkada waterfall : पांडवकडा धबधबा ठरतोय मृत्यूचा सापळा

आठवडाभरात दुसरा बळी; १६ वर्षीय तरुण बुडाला; अग्निशमन जवानांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर
Pandavkada waterfall
Pandavkada waterfallpudhari photo
Published on
Updated on

पनवेल : विक्रम बाबर

खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी धोकादायक ठरत असून, अवघ्या एका आठवड्यात येथे दुसऱ्या बळीची घटना घडली आहे. बुधवारी (१९ ऑगस्ट) धबधब्यात एक व्यक्ती बुडाल्याची वर्दी मिळताच सिडको अग्निशमन केंद्र, खारघर येथील जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. या दुर्घटनेत प्रणव मिश्रा (वय १६, रा. कुर्ला) याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अग्निशमन केंद्राला सायंकाळी ५.४९ वाजता पांडवकडा धबधबा येथे व्यक्ती बुडाल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर खारघर अग्निशमन केंद्राची फायर जीप आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर धबधब्यात वरून मोठ्या प्रमाणात पाणी कोसळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. अग्निशमन जवानांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून परिसरात शोधमोहीम सुरू केली.

Pandavkada waterfall
Borivali Virar railway project : बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका 30 टक्के पूर्ण

शोध घेत असताना दगडाच्या कपारीत अंदाजे १० ते १२ फूट खोलवर एक व्यक्ती अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. जवानांनी अथक प्रयत्न करून त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने त्याला डोंगराच्या खाली आणण्यात आले आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत व्यक्तीचे नाव प्रणव मिश्रा असून तो कुर्ला येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, पांडवकडा धबधब्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धबधब्याचा प्रवाह वाढल्यानंतर पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक असतानाही पर्यटकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अवघ्या आठवडाभरात दोन बळी गेल्याने पांडवकडा धबधबा हा पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Pandavkada waterfall
Konkan rainfall : सप्टेंबरमध्‍ये पाऊस आला तरच भातशेती तरणार

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठिकाणी कडक बंदोबस्त, प्रवेशबंदी आणि प्रभावी जनजागृती करण्याची मागणी होत आहे. अग्निशमन पथकातील कर्मचारी अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन एन. एम. कडू, यू. एम. पाटील, सी. सी. पवार, एस. बी. मोहिते आणि यंत्रचालक एस. व्ही. पाटील यांनी बचावकार्य केले.

मागील काही वर्षात येथे अपघाताच्या घटनांमध्ये अनेकांचे बळी केले आहेत, त्यामुळे सध्या धोकादायक धबधब्यांच्या ठिकाणी बंदी आहे. तरीही अपघात घडत आहेत.

यावर्षी धबधब्यांवर पाचजणांचे मृत्यू ?

बुधवारी या घटनेत शोध घेत असताना दगडाच्या कपारीत अंदाजे १० ते १२ फूट खोलवर एक व्यक्ती अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. जवानांनी अथक प्रयत्न करून त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने त्याला डोंगराच्या खाली आणण्यात आले आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत व्यक्तीचे नाव प्रणव मिश्रा असून तो कुर्ला येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावर्षीच्या पावसाळ्यात धबधब्यांवर दुर्घटनांमध्ये आतापर्यं पाचजणांची मृत्यू झाला आहे. यातील चार घटना पनवेल तालुक्यातील पांडवकडा आदी परिसरातील तर एक माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यावरील असल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news