Poladpur Waste Management: पोलादपूरमध्ये कचरा व सांडपाण्याचा बोजवारा; सावित्री नदी प्रदूषणाच्या विळख्यात

डम्पिंग ग्राउंडचा अभाव, सांडपाणी थेट नदीत; नगरपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
Poladpur Waste Management
Poladpur Waste ManagementPudhari
Published on
Updated on

पोलादपूर : समीर बुटाला

एकी कडे वाढते इमारतीचे काम तर दुसरी कडे सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नसल्याने शहरात स्वछता नावांची नुसती बोंब आहे . शहरातील नदी किनारी वसलेल्या काही घरातील सांडपाणी गटारे मार्गे थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने आधीच कचरा पोटात घेऊन वाहणाऱ्या सावित्री नदीचे पात्र दूषित होत आहे . त्यातच रोजचा रोज गोळा होणारा कचरा टाकण्यात येत असल्याने या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारता आहेत. नेहमीच दिसणारे हे विदारक चित्र बदलण्याची गरज निर्माण झाली असून पोलादपूर शहरात व तालुक्यातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन साठी डम्पिंग ग्राउंड सह कचऱ्यावर प्रकिया करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे बनले आहे.

Poladpur Waste Management
Raigad ZP election: सुधागडमध्ये ‘हायटेक’ निवडणूक प्रचाराचा जोर; सोशल मीडियावरूनच रंगतोय सत्तासंघर्ष

पोलादपूर नगरपंचायत शहरातील कचरा संकलन करते मात्र त्यावर प्रकिया न करता थेट नदीच्या पात्रात कचरा फेकण्यात येत आहे. त्यातच नदी किनारी लगत जुना महाबळेश्वर मार्गासह नदी किनारी वसलेल्या अनेक घरातील सांडपाणी गटारातून थेट सावित्री नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पोलादपूर शहरात डम्पिंग ग्राऊंण नसल्याने व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. थेट शहरात संकलन केलेल्या सुका - ओला कचरा नदीच्या पात्रात खाली करण्यात येत आहे. तीन वर्षापूर्वी संपूर्ण कचरा स्मशानभूमीत लगत टाकण्यात येत होता. पावसाळ्यात या ठिकाणी दुर्गंधी सुटल्याने जेसीबीच्या साहयाने नदीत थेट ढकलण्यात आला होता. या नंतर सदरचा कचरा नदीच्या पात्रात टाकण्यात येऊ लागला होता

Poladpur Waste Management
Diveagar Road Accidents: श्रीवर्धन–दिवेआगर मार्गावर अपघातांची मालिका; पर्यटकांच्या बेदरकारपणामुळे स्थानिकांमध्ये भीती

पोलादपूर शहराचा चेहरा सद्य स्थितीत बदलत असून शहरातील स्वछतेचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे . रस्ते साफसफाईसह कचरा संकलन करणे म्हणजे स्वच्छ शहर होत नाही.त्यासाठी नगरपंचायत कडे कचरा वर प्रकिया करणारी यंत्रणेसह सांडपाणीचे योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायत ची नगरपंचायत झाल्या नंतर पहिल्या पंचवार्षिक मधील अनेक प्रश्न उभे असले तरी दुसऱ्या पंचवार्षिक मधील शेवटचे काही महिने बाकी असल्याने ते सुटतील असा आशावाद व्यक्त होत असला तरी मुख्य डम्पिंग साठी लागणारी जागा व त्यावर निर्माण करण्यात यंत्रणा बघता हा प्रश्न सुद्धा सद्यस्थितीत कागदावर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचऱ्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे.

Poladpur Waste Management
Zero Tillage Val Cultivation: शून्य मशागत तंत्राची कमाल; पेणच्या गागोदे गावात 40 एकरांवर बहरले उन्हाळी वाल

प्रक्रियेद्वारे खताची निर्मिती करा

ग्रामीण भागात ओला कचऱ्यापासून खत किंवा इतर प्रकिया करत त्याचा योग्य वापर होणार आहे गॅसनिर्मिती सह गांडूळ खत आदी तयार करणे शक्य आहे कचऱ्याचे संकलन केल्या नंतर त्याचे दोन वेगवेगळ्या भागात विभाजन करून ओला कचरा एका खड्यात टाकून त्याचे खत निर्माण करणे किवा सुका व ओला कचरा वर प्रकिया करणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news