Pen Vegetable Market: पेण मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गर्दी; अनेक भाज्यांचे दर वाढले

टाॅमेटो, कोबीचे दर नियंत्रणात; स्थानिक भाजीलाच अधिक मागणी
Pen Vegetable Market
Pen Vegetable MarketPudhari
Published on
Updated on

गडबः गणेसोत्सवात शाकाहारालाच पंसती आसल्याने या काळावधीत जेवणामध्ये भाज्याचाच वापर केला जात आसल्याने भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पेण - वडखळ बाजारात भाजी खरेदीसाठी गर्दि होत आहे तर स्थानिक भाजीलाच जास्त मागणी आसल्याचे दिसत आहे. तर भाज्याचे दर किलोमागे दहा ते विस रुपयांने वाढले आहेत.

गणेशोत्सवात शाकाआहारालच पंसती आसल्याने जेवणामध्ये भाज्याचाच वापर होत आसल्याने भाज्याची मागणी वाढली आहे तर विशेष करुन गणेशोत्सवासाठी आलेले मुंबई , ठाणे येथुन आलेले चाकरमाणी गणेश भक्ताची स्थानिक गावठी भाजीला पंसती असल्याने या भाज्याची मागणी वाढली आहे.

Pen Vegetable Market
Panvel Modak Shopping: बाप्पाच्या स्वागतासाठी मोदकांची रेलचेल; रंगीबेरंगी मोदकांनी पनवेल सज्ज, मोदक खरेदीसाठी गर्दी

या स्थानिक भाज्याचे उत्पादन आदिवासी बांधव करत असल्याने त्याच्या भाज्याना मागणी असल्याने त्यांना चांगला मोबदला मिळत आहे. भाज्याचे मागील महिन्यात जे दर होते त्यापेक्षा दहा ते विस रुपयांनी वाढले असले तरी ग्राहक मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करत असुन भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दि होत आहे. विशेष करुन पेण येथील कृषी उत्पन्न समीतीच्या भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी ग्राहक गर्दि करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाज्याची खरेदी विक्री होत आहे.

तर आता बाजारात वांगी ५० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, टाॅमेटो ३० रुपये किलो , मटार १०० रुपये किलो मिरची ६० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो, फरसबी ६० रुपये किलो ने विकली जात आहे. तर कोथीबिर जुडी २० रुपये, मेथी १५ ते २० रुपये जुडीने विकली जात आहे रुपये तर फ्लाॅवर ८० कोबी ३० शिमला ६० मिरची ५० शेवग्याच्या शेंगा ५० रुपये दराने विक्री होत होत आहे.

Pen Vegetable Market
Raigad Ganeshotsav: रायगडमध्ये आज लाडक्या बाप्पाचे आगमन!

पेण परिसरात भेंडी, शिराळा, कारली, काकडी व पालेभाज्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते या भाज्याना मागणी वाढली आहे. तरी या भाज्यामध्ये वांगी, टाॅमेटो, मिरची, कोंथीबिर या भाज्याची आवश्यकता आसल्याने आसल्याने दर कमी आसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

काही भाज्यांचे दर वाढले असले तरी भाज्या खरेदी कराव्याच लागतात. गणेशोत्सवात पूुजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आसल्याने जेवणामध्ये भाज्याचाच वापर होत आसल्याने भाजी खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

गणेशोत्सवात शाकाहारी जेवणालाच पंसती असते व या कालावधीत अनेक पाहुणेे येत आसल्याने जेवणात भाज्यांचा अधिक वापर होत असल्याने भाज्यांचे दर वाढले तरी भाज्या खरेदी कराव्याच लागतात.

- मोहिनी पाटील, गृहिणी

घाउक बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. गाडीभाडा वाढल्याने काही भाज्यांचे दर थोड्या फार प्रमाणात वाढले असले तरी मुबलक प्रमाणात भाजी बाजारात विक्रीसाठी आहे.

- निलेश पाटील, भाजी विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news