Panvel Modak Shopping: बाप्पाच्या स्वागतासाठी मोदकांची रेलचेल; रंगीबेरंगी मोदकांनी पनवेल सज्ज, मोदक खरेदीसाठी गर्दी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये मोदक खरेदीला वेग आला आहे. उकडीच्या मोदकांसह मावा, काजू, चॉकलेट, ड्रायफ्रूट, केशर आणि गुलकंद मोदकांना गणेशभक्तांची पसंती मिळत आहे.
Panvel Modak Shopping
Panvel Modak ShoppingPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीला वेग आला आहे. बाप्पाचा आवडता नैवेद्य असलेल्या मोदकांनी बाजारपेठाही सजल्या असून, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांकडे गणेशभक्तांचे लक्ष वेधले जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच मोदक खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पारंपरिक उकडीच्या मोदकांसह मावा, काजू, चॉकलेट, ड्रायफ्रूट, केशर, गुलकंद आणि विविध फ्लेवर्सच्या मोदकांना मागणी वाढली आहे.

बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या मोदकांबरोबरच आकर्षक पॅकिंगमधील तयार मोदकही बाजारात उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी आणि विविध आकारांच्या मोदकांनी मिठाईची दुकाने सजली असून, ग्राहकांकडून आवडीने त्यांची खरेदी केली जात आहे.

Panvel Modak Shopping
Roha Ganeshotsav Rain: रायगडमधील गणेशोत्सवावर पावसाचे सावट

यंदा विविध प्रकारच्या मोदकांच्या किमतीतही वाढ झाल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. साध्या मोदकांपासून प्रीमियम ड्रायफ्रूट आणि चॉकलेट मोदकांपर्यंत किलोमागे दर वेगवेगळे आहेत.

कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीचा मोदक घेण्यासाठी नागरिक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. काही ग्राहकांकडून किलोच्या प्रमाणात मोदकांची खरेदी केली जात आहे, तर काही जण विविध प्रकारचे मोदक असलेले मिश्र पॅक पसंत करत आहेत.

बाप्पाला आवडणारा नैवेद्य म्हणून मोदकाला गणेशोत्सवात विशेष महत्त्व असल्याने यंदाही मोदकांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

‘बाप्पा येणार... मग मोदक तर हवाच!’ या भावनेतून गणेशभक्तांची मोदक खरेदी सुरू असून, पनवेलच्या बाजारपेठेत गणेशोत्सवाचा गोडवा दरवळू लागला आहे.

Panvel Modak Shopping
Raigad Ganeshotsav: रायगडमध्ये आज लाडक्या बाप्पाचे आगमन!

मोदकांच्या किंमतीतही वाढ

यंदा विविध प्रकारच्या मोदकांच्या किमतीतही वाढ झाल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. साध्या मोदकांपासून प्रीमियम ड्रायफ्रूट आणि चॉकलेट मोदकांपर्यंत किलोमागे दर वेगवेगळे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news