

Pen City Water Problem
पेण : पेण शहरासह तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने या प्रकाराने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे अनेक रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागत असून याकडे गांभीयनि लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान या अशुद्ध पिण्याच्या पाण्याला कंटाळून अनेकांनी आता आपल्या घरात क्वागार्ड बसवून पाण्याचे बाहेरील फिल्टर केलेले जार विकत घेण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळा सुरू झाला की पेण मधील नागरिकांना कावीळ सारख्या अनेक रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कितीही चांगल्या प्रकारे निगा राखली जात असेल किंवा पाणी शुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचा पुरवठा तेथून केला जात असल्याचे संबंधित अधिकारी जरी सांगत असतील तरी पुढे नागरिकांपर्यंत ज्या पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या लाइन बऱ्याच ठिकाणी फुटलेल्या आहेत.
प्रतिक्षा एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून आम्ही बारा शाखेतून दर महिन्याला १५० ते २०० अॅक्वागार्ड सेल करतो त्यामध्ये पावसाळ्यातील विक्रीचे प्रमाण हे अधिक असते. नळाद्वारे खराब येणारे पिण्याचे पाणी हे एक महत्वाचे कारण येणारा ग्राहक आवर्जून सांगत असतो, अशी माहिती प्रतीक्षा शेळके यांनी दिली.