Water Issue: पेण-खारेपाटला मिळणारे पिण्याचे पाणी दूषित; साथीचे रोग पसरण्याची भीती

अहवालातूनआले धक्कादायक सत्यबाहेर; परिसरात खळबळ
Water Issue
Water IssuePudhari
Published on
Updated on

प्रकाश माळी

वढाव: पेण तालुक्यातील खारेपाट भागातील समस्या संपता संपेना, खारेपाट भागात पिण्यासाठी येणारे पाणी दुषितअसल्यानेअनियमित येत असुन येणारे पाणी सुद्धा अशुद्ध अयोग्य आहे असा निकष जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेतुन दिला असल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी यांच्या मार्फत खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने पाठवलेले पाणी शुद्धीकरण, सनियंत्रण व टीसीएल गुणवत्ता तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे.पेण तालुक्यातील खारेपाट भागातील सर्व गावातील फेब्रुवारी चे व मार्च 2026 चे पिण्याचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Water Issue
Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेचे हप्ते अचानक बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेतून तपासणी केली जाते. त्याच्या अहवालानुसार जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा अधिकारी यांच्यामार्फत प्राप्त झाला आसुन ते पाणी पिण्यास अयोग्यआहे. या पाण्यामुळे नागरीकांच्याआरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

खारेपाटातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. खारेपाटाला कोणीही वाली शिल्लक राहिला नाही. नाही प्रशासन तसेच निवडणूकीच्या काळात मोठ-मोठ्या बढाया मारुन शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी.

Water Issue
‌Cooper Hospital Stray Dogs: ‘कूपर‌’मध्ये श्वान, मांजरांचा त्रास कायम; महिन्यानंतरही उपाययोजना ठप्प

देशाला स्वतंत्र मिळून कीतेक वर्ष झाली पंरतु पेण खारेपाट जनता शुध्द पाण्या आभावी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. असे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगत आहेत. वाशीनाका ते वाशी व वढाव, गावापर्यंतची ही नवीन 38 कोटी रुपये खर्च करून जलवाहिनीचे काम केले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आसुन महिन्यातून 4 ते 5 वेळा फुटण्याचे प्रकार सुरु आहेत.

सदर जलवाहिनीच्या कामा मुळे पैसा वेळ वाया गेला आहे. या पाईपलाईनवर तर गेले काही वर्षांपासून नियमितपणे ओला सुका कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे जलवाहिनीमधून वाहणारे पाणी दुर्गंधयुक्त, विषाणूजन्य होत असून, हेच पाणी फुटलेल्या जलवाहिनीतून खारेपाटत सर्व गाव व वाड्यांमध्ये पोहोचत असल्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, कावीळ यांसारख्या साथीचे आजार उद्भवण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

वाशी प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत वाशी खारेपाट भागातील फेब्रुवारी व मार्च मधील पिण्याच्या पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठवले होते. त्यांच्या आलेल्या आवहाला मधे सर्व पाणी नमुने पिण्यास अयोग्य आसल्याचे स्पष्ट झाले आहेत.आम्ही सर्व ग्रामपंचायत व पंचायत समिती तसेच पाणी पुरवठा विभागाला पत्र व्यवहार करुन योग्य उपाययोजना करण्यास सागितले आहे.

- डॉ मनिषा म्हात्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी

शहापाडा धरणावरील फिल्टरेशन प्लांट बंद आसल्याने थेट पिण्याचे पाणी नळाद्वारे पाणी गावांपर्यंत पोहचतोय. . आम्ही सर्व ग्राम पंचायतला पत्र व्यवहार करुन पाणी उकळून प्यावे आशा सुचना दिल्या आहेत. तसेच डोस चे नियोजन केले आहे. तसेच जलवाहिनी वर कचरा टाकला जातो त्याच्या वर गुन्ह दाखल केला आहे.जीवन प्राधिकरण विभागाने आमच्या सोबत 15 दिवस काम केले तर हा पाणी प्रश्न सुटू शकतो.

- सेफाली देशमुख, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकरी पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news