‌Cooper Hospital Stray Dogs: ‘कूपर‌’मध्ये श्वान, मांजरांचा त्रास कायम; महिन्यानंतरही उपाययोजना ठप्प

रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Stray Dog Killing
Stray Dog Killingfile photo
Published on
Updated on

मुंबई: विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात भटके श्वान आणि मांजरांचा त्रास अद्यापही कायम असून, महिनाभर उलटूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. रुग्णालय आवारात तसेच वॉर्ड परिसरात प्राण्यांचा मुक्त वावर वाढल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपाययोजना होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हे रुग्णालय आहे की प्राण्यांचा अड्डा ? असा सवाल उपस्थित करत मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली जात आहे.

Stray Dog Killing
‌Bhabha Hospital: ‘भाभा‌’तील लॅब टेक्निशियन्सच्या पात्रतेवर प्रश्न

दरम्यान, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देवदास शेट्टी यांनी संबंधित यंत्रणांसोबत बैठका घेतल्याची माहिती दिली. भटक्या श्वानांसाठी आश्रयस्थळ उभारण्यास वेळ लागणार आहे. काही बाहेरील व्यक्ती रुग्णालयात घुसून प्राण्यांना अन्न देतात आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना विरोध करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्राणीप्रेमींनी या श्वानांना दत्तक घेऊन जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रुग्णालय परिसरात सहज अन्न उपलब्ध होत असल्याने भटक्या प्राण्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, चावा घेण्याच्या घटना, अस्वच्छता आणि संसर्गाचा धोका वाढला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती कायम राहणे चिंताजनक असून, महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Stray Dog Killing
Prabhadevi Bridge Demolished: प्रभादेवी पूल अखेर इतिहासजमा; पाडकाम पूर्ण

प्राणिप्रेमींचाही उपद्रव

रुग्णालय परिसरात भटक्या प्राण्यांना नियमित अन्न दिले जात असल्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. अन्न देणाऱ्या व्यक्तींना तसे न करण्यास सांगितल्यास सुरक्षा रक्षकांना विरोध आणि धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news