Chimbhave Dhangarwadi heavy rain: चिंभावे धनगरवाडीत वादळी पावसाचा कहर! ग्रामदैवत भैरी देवीचे मंदिर कोसळले

वादळीवाऱ्यामुळे खाडीपट्ट्यात मोठी हानी; कौलारू घरांचेही मोठे नुकसान; जीवितहानी टळली
Chimbhave Dhangarwadi heavy rain
Chimbhave Dhangarwadi heavy rainPudhari
Published on: 
Updated on: 

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी कोसळलेला मुसळधार पाऊस आणि तुफान वादळी वाऱ्याने खाडीपट्टयातील दुर्गम अशा चिंभावे धनगरवाडीला अक्षरशः झोडपून काढले आहे.

या अतिवृष्टीत चिंभावे गावचे ग्रामदैवत श्री भैरी देवीचे मंदिर जमीनदोस्त झाले असून तर त्याच वाडीतील त्या सोबतच एक घरावर झाड कोसळून घराचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Chimbhave Dhangarwadi heavy rain
Raigad Zilla Parishad Schools: पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ३६० शाळा होणार बंद ?

मंदिराच्या भिंतींसाठी वापरलेले जांभा दगड, छताचे लाकडी भाले, वासे, कोणे आणि वरच्या कौला यांचा वादळात चक्काचूर झाला आहे. तलाठी सजा चिंभावे येथील ग्राम महसूल अधिकारी संतोष कदम यांनी पंचनाम्यात या मंदिराचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

त्याच वादळात गावातील हिरा प्रकाश आखाडे यांच्या घरावर दोन मोठी झाडे उन्मळून पडली. हे घर देखील पूर्णपणे कौलारू होते. त्यामुळे ३०७ कौले, लाकडी वासे, भिंती आणि लाकूड यांचे मोठे नुकसान झाले.

या दुसऱ्या घटनेचा स्वतंत्र पंचनामा देखील त्याच दिवशी करण्यात आला असून, यामध्ये देखिल मोठे नुकसान पोहचले आहे. दोन्ही घडली तेव्हा घरात कोणीही वास्तव्याला नसल्याने मोठी जीवितहानी थोडक्यात टळली आहे अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेतील सर्वात विदारक वास्तव म्हणजे चिंभावे धनगरवाडीचे दुर्गमत्व. या वाडीत जाण्यासाठी चिंभावे सुतारकोंड या मुख्य रस्त्यापासून तब्बल येऊन-जाऊन ७ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो.

Chimbhave Dhangarwadi heavy rain
Mumbai FDA Action: रंगाचा संशय असलेले वेफर्स, फरसाण, जिलेबी केली जप्त; एफडीएचा दणका

गाडी जाण्यासाठी रस्ताच नाही. अशा आपत्कालीन घटना घडल्यानंतर तेथे शासकीय मदत, वैद्यकीय मदत किंवा साहित्य पोहोचवणे फार दुरापास्त होते. एक महिन्याने आलेल्या पावसाने वाडीचा संपर्कच तुटल्यासारखिच परिस्थिती उभी राहिली होती.

दरम्यान, दोन्ही पंचनामे तहसील कार्यालय, महाड येथे सादर करण्यात आले असून, ग्रामस्थ शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे वातावरण असले तरी मध्य आणि उत्तर रायगडमध्ये तीव्र उन्हाळा जाणवत आहे.

तलाठी कार्यालय गाठण्यासाठी सात किमीची पायपीट

आम्ही डोंगर कपारीत राहतो. मंदिर जमीनदोस्त झाले, घर पडले, पण झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी कार्यालय गाठायचे झाले तर ७ किलोमीटर पायपीट करावी लागते. शासनाने आमच्या दुर्गम भागाचा विशेष विचार करून तातडीने नुकसान भरपाई आणि रस्त्याची सुविधा द्यावी.

ही सायंकाळी घटना घडली. रात्री झाली असती तर काय झाले असते. याचा विचार न केलेला बरा आहे. गावात जाण्यासाठी आम्हाला पक्का रस्ता बनवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शासकीय पंचनामा करायला गेलेल्या चिंभावे सजाच्या ग्राम महसूल अधिकारी संतोष कदम यांच्याकडे केली आहे.

यावेळी अधिकारी देखील पायपीट करून गेल्यामुळे निशब्द झाले आणि शासनाकडे आपली मागणीचा पाठपुरावा करू असे ग्रामस्थांना त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news