Uran Water Shortage: उरणकरांनो, पाणी जपून वापरा! २७ ऑक्टोबरपासून पाणी कपात; पुढील काळात टंचाईचे संकट

रानसई धरणाच्या पाण्याच्या पातळीत दिवसागणिक घट
Uran Water Shortage
Uran Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

पंकज ठाकूर

कोप्रोली उरण: उरण अल निनो भयंकर संकटामुळे पावसाने ओढ दिल्याने सर्वत्रच पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. उरण परिसरही पाणी टंचाईला अपवाद नाही. तालुक्यातील शहर, ग्रामीण आणि औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणारे एकमेव असलेले  रानसई धरणाच्या पाण्याची पातळी पावसाअभावी दररोज एक एक इंचाने घटत चालली आहे.

उरणकरांना ऑक्टोबर महिन्यापासूनच गरजे इतक्यात पाण्यासाठी आणखी किमान पुढील १० महिन्यांपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. पाणीपुरवठ्याचे आणखी कोणतेही स्त्रोत नसल्याने उरणकरांनो पाणी जपून वापरण्याचे आवाहन शासकीय स्तरावरून केले जात आहे.

Uran Water Shortage
Chimbhave Dhangarwadi heavy rain: चिंभावे धनगरवाडीत वादळी पावसाचा कहर! ग्रामदैवत भैरी देवीचे मंदिर कोसळले

सुमारे २ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या उरण तालुक्यातील उरण शहर -४.५० एमएलडी, ग्रामीण भागातील २० ग्रामपंचायतींना -६.५० एमएलडी तर औद्योगिक क्षेत्राला दररोज २५ एमएलडी पाण्याची गरज भासते.

एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तर पुर्व भागातील १० गावातील ३५ हजार रहिवाशांना पाणी पुनाडे धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

चिरनेर, कोप्रोली, खोपटा आदी ग्रा.पं.ना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो.मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने सर्वांनाच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची उंची ११६ फुट आहे .मात्र पावसाअभावी पाणी साठवण क्षमता शुक्रवारपर्यंत (१६) ११३.२ फुटापर्यंत कमी झाली आहे.दररोज धरणाची पाणीपातळी एका इंचाचे कमी होत चालली आहे.

Uran Water Shortage
Mumbai FDA Action: रंगाचा संशय असलेले वेफर्स, फरसाण, जिलेबी केली जप्त; एफडीएचा दणका

जलकुंभ, पाणी शुद्धीकरण यंत्रणाही सुस्थितीत आहे.तसेच जलवाहिन्यांतील पाणी गळतीचे प्रमाणही अत्यल्प आहे.मात्र याउपरही दररोज धरणातील घटणारी पाण्याची पातळी सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे. 

याआधीपासुन मंगळवार, शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस पाणी लागु करण्यात आली आहे. त्यानंतर आता शासनानेच पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. 

मात्र सध्या सणासुदीचे दिवस असल्याने उरणच्या नागरिकांसाठी असलेली पाणी कपात येत्या २७ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता तानाजी कांबळे यांनी दिली. 

पावसाअभावी आलेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन एमआयडीसीचे उप अभियंता तानाजी कांबळे यांनी केले आहे.

कोणतेही स्त्रोत नसल्याने उरण शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. ३५ ते ४० हजारांची लोकसंख्या असलेल्या उरण शहराला दररोज ४.५० एमएलडी इतक्या पाण्याची गरज भासते.मात्र पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन नसल्याने ४० कोटींची थकबाकी असलेल्या उरण नगरपरिषदेला पाणी टंचाईच्या झळा सहन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मागील १५ ते २० वर्षांपासून उनपने ५ जलकुंभाची साफसफाईच केली नाही. यामुळे नागरिकांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असा आरोप दस्तुरखुद्द नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीच करून ही गंभीर बाब प्रशासनाच्या नजरेत आणून दिली आहे. 

उरणवासियांना पाणीटंचाईचा याआधीच सामना करावा लागतो आहे. यामध्ये आता शासनाने लागू केलेल्या पाणी कपातीची भर पडली आहे. मात्र पाणीपुरवठ्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जात आहे. तसेच जलकुंभही सुस्थितीत असून थोड्याफार प्रमाणात दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे नगररचनाकार निखिल ढोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news