Black Spot RTO Panvel | गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ अॅप चा वापर करा; अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार आधीच माहिती

गणेशभक्त, चाकरमानी आणि वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित व अपघातमुक्त व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलतर्फे ‘Black Spot RTO Panvel’ हे विशेष मोबाईल अॅप विकसित
Black Spot RTO Panvel
Black Spot RTO Panvel Pudhari
Published on
Updated on

Ganeshotsav Konkan Travel Traffic Advisory

पनवेल : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा तसेच कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. गणेशभक्त, चाकरमानी आणि वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित व अपघातमुक्त व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलतर्फे ‘Black Spot RTO Panvel’ हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. कोकण प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनचालकांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

या अॅपच्या माध्यमातून महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’, धोकादायक वळणे तसेच संभाव्य धोकादायक क्षेत्रांची माहिती वाहनचालकांना आधीच मिळणार आहे. वाहन संबंधित ठिकाणाच्या जवळ पोहोचताच अॅपद्वारे चालकाला अलर्ट मिळणार असल्याने वेग कमी करून आवश्यक ती खबरदारी घेणे शक्य होणार आहे.

Black Spot RTO Panvel
Panvel Municipal Corporation: एसआयआरची धावपळ अन् गणपतीत विभागीय परीक्षा

Android आणि iOS वर अॅप मोफत

‘Black Spot RTO Panvel’ हे अॅप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे. Google Play Store तसेच Apple App Store वरून प्रवासी आणि वाहनचालकांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आरटीओने म्हटले आहे.

अॅप डाऊनलोड लिंक :

"Black Spot RTO Panvel – Google Play Store" https://reference-url-citation.invalid/0

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेकिंग टाळावे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट तर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Black Spot RTO Panvel
Panvel Doctor Harassment Case: द्विअर्थी मेसेज, इमोजी अन् हाताचे चुंबन घेत विनयभंग; महिला डॉक्टरच्या तक्रारीअंती पुरुष डॉक्टरवर गुन्हा

मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये. तसेच वाहन चालवताना थकवा किंवा झोप येत असल्यास सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवून पुरेशी विश्रांती घ्यावी आणि त्यानंतरच पुढील प्रवास करावा, असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरक्षित वाहन चालवा आणि कुटुंबासह सुखरूप घरी पोहोचा,’ असा संदेश प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news