Panvel Cricket Training Centre : पनवेल क्रिकेट अकादमीची वर्षभरातच दुरवस्था

मैदान पुन्हा दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च; गुजरातची सॅण्ड निष्प्रभ , कोलकत्त्यावरून नवी माती
Panvel Cricket Training Centre
Panvel Cricket Training Centrepudhari photo
Published on
Updated on

पनवेल : विक्रम बाबर

पनवेल महानगरपालिकेने तब्बल १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च करून नवीन पनवेल येथे उभारलेल्या पद्मश्री दिलीप वेंगसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या मैदानाची अवघ्या वर्षभरातच दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. २७ एप्रिल २०२५ रोजी राज्याचे क्रीडामंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या एक वर्ष दोन महिन्यांतच मैदानाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा लाखो रुपयांचा खर्च करण्याची वेळ पनवेल महानगरपालिकेवर आली आहे.

या प्रकल्पातील मुख्य क्रिकेट खेळपट्टी (पिच) सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले जात असले, तसेच अकादमीची इमारत देखील अद्यावत अशी आहे. तरी खेळपट्टीच्या आजूबाजूच्या संपूर्ण मैदानासाठी टाकण्यात आलेली सॅण्ड आणि गवताचा थर निकृष्ट ठरल्याची चर्चा आहे. मैदानावर टाकलेली सॅण्ड स्थानिक वातावरणाशी सुसंगत न ठरल्याने अपेक्षित प्रमाणात गवत उगवलेच नाही. ज्या ठिकाणी गवत उगवले, तेही काही दिवसांत करपून खराब झाले.

Panvel Cricket Training Centre
Sambhajinagar News : सिद्धार्थ उद्यान जलतरण तलावावर खर्चाचा वर्षाव

परिणामी मैदानाचा पृष्ठभाग कठीण आणि असमान बनल्याने सराव करणाऱ्या क्रिकेटपटूंना हात, पाय आणि शरीरदुखीचा त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी पुढे आल्या. सुरुवातीला मैदानासाठी गुजरातमधून सॅण्ड आणि इतर साहित्य आणण्यात आले होते. मात्र, ते पनवेलच्या हवामान व स्थानिक भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत ठरले नसल्याने मैदानाची गुणवत्ता टिकून राहिली नाही, अशी माहिती समोर येत आहे. खेळाडूंकडून सातत्याने तक्रारी आल्यानंतर आता मैदान नव्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कलकत्त्यावरून विशेष माती ( सँड ) मागवून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे.

यासाठी पुन्हा लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे समजते. महानगरपालिका आणि पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेमध्ये या क्रिकेट अकादमीच्या संचालनासाठी करार करण्यात आला आहे. या करारानुसार पालिका हद्दीतील ५० टक्के, रायगड जिल्ह्यातील २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी दिली जाते. मात्र, एवढ्या मोठ्या खर्चातून उभारलेल्या प्रकल्पाच्या मैदानाची अवघ्या वर्षभरातच पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आल्याने नियोजन, कामाचा दर्जा, साहित्याची गुणवत्ता आणि देखभालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Panvel Cricket Training Centre
Pimpri Chinchwad EV Vehicle Cost: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इलेक्ट्रिक वाहनांवर वाढता खर्च; उधळपट्टीचा आरोप

या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर पुन्हा लाखो रुपये खर्च करण्याची वेळ का आली, याची चौकशी व्हावी, तसेच या कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.

१४ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च

पनवेल महानगरपालिकेचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. नवीन पनवेलमधील साडेसात एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी १४ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. येथे १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, आधुनिक पॅव्हेलियन इमारत तसेच विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. या अकादमीचे संचालन पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेमार्फत केले जात असून दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

दुरुस्तीची माहिती नाही

पद्मश्री दिलीप वेंगसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रा मध्ये सध्या काम काय सुरू आहेत याची माहिती नाही, माहिती घेऊन आपण माहिती दिली जाईल असे पालिकेच्या एका बांधकाम अभियंता यांनी दिली आहे.

महापौरांचा कारवाईचा इशारा

२०२५ मध्ये अकादमीच्या मैदानाचे काम करणाऱ्या ठेकरावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे तसेच सध्या काम करत असलेला ठेकेदार नामांकित असून मोठे मैदाने त्यांनी विकसित केले आहेत, खेळाडूंच्या हितासाठी हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. खेळाडूना या पुढे कोणताही त्रास होणार नाही या विचाराने काम सुरू आहे,असे महापौर नितीन पाटील यांनी सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news