Panvel Municipal Election: पनवेलच्या निवडणुकीने रायगडच्या राजकारणात मोठा धक्का

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी (शप) गटाचे जिल्हा प्रमुख पराभूत
Panvel Municipal Election
Panvel Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

पनवेल : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निकाल पनवेल महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत समोर आला असून काँग्रेसचे जिल्हा प्रमुख सुदाम पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हा प्रमुख सतीश पाटील या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेतृत्वाचा निवडणुकीत पराभव झाला आहे. पक्षाची धुरा वाहणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा झालेला पराभव केवळ वैयक्तिक अपयश नसून, तो संबंधित पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या चिंताजनक मानला जात आहे.

Panvel Municipal Election
Kalamboli Election Result: कळंबोलीत महायुतीचा दबदबा; प्रभाग 7 ते 9 मध्ये भाजप–महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हा प्रमुख सतीश पाटील यांना भाजपचे उमेदवार बबन मुकादम यांनी 1 हजार 825 मतांची आघाडी घेत पराभूत केले. सतीश पाटील हे माजी नगरसेवक असून जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला स्पष्ट कौल दिल्याने राष्ट्रवादी अजितदादा गटासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

Panvel Municipal Election
Panvel Election Result 2: नात्यांवर मात करत मेव्हण्याचा विजय; पनवेलमध्ये दाजी–मेव्हण्याची लढत चर्चेत

दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुदाम पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक अमर पाटील यांनी तब्बल 2 हजार 489 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. काँग्रेससारख्या जुन्या पक्षात जिल्हा प्रमुख पदावर असलेल्या नेत्याचा पराभव होणे हे अंतर्गत अस्वस्थता आणि संघटनात्मक कमकुवतपणाचे द्योतक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Panvel Municipal Election
Panvel Election Result: पनवेल महापालिकेवर पुन्हा भाजप महायुतीची एकहाती सत्ता; ५९ जागांसह दणदणीत विजय

विशेष म्हणजे सतीश पाटील पराभूत नेते माजी नगरसेवक असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जात होते. तरीही निवडणुकीत त्यांना मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. जिल्हा प्रमुख हे पद कोणत्याही पक्षात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण संपूर्ण जिल्ह्यातील संघटन, रणनीती आणि निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी या पदावर असते. त्यामुळेच दोन्ही जिल्हा प्रमुखांचा पराभव हा संबंधित पक्षांच्या नेतृत्वासाठी आत्मपरीक्षणाचा विषय ठरला आहे.

Panvel Municipal Election
NOTA Votes in Panvel | पनवेल महापालिका निवडणुकीत ‘नोटा’चा ठळक संदेश; ४३ हजारांहून अधिक मतदारांचा उमेदवारांना नकार

या निकालानंतर रायगडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजितदादा गटात संघटनात्मक बदल होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news