Kalamboli Election Result: कळंबोलीत महायुतीचा दबदबा; प्रभाग 7 ते 9 मध्ये भाजप–महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

प्रभाग 7, 8, 9 मध्ये महाविकास आघाडीचा सूपडा साफ; प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचा गजर
Kalamboli Election Result
Kalamboli Election ResultPudhari
Published on
Updated on

कळंबोली : दीपक घोसाळकर

पनवेल महापालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालामध्ये कळंबोलीतील प्रभाग क्रमांक सात आठ नऊ आणि दहा यामध्ये महायुतीचेच वर्चस्व असल्याचे निकालावरून दिसून आले. महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला निवडणूक जिंकता आली नाही. महाविकास आघाडीने मतदारांना मालमत्ता कर कमी करण्याचे दाखवलेले प्रलोभन पचनी पडले नसल्याने त्यांच्या प्रलोभनाचा स्वीकार मतदारांनी केलेला दिसून आला नाही. मतदारांनी विकासाला प्राधान्य देऊन चारही प्रभागातील भाजपच्याच उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिल्याने पुन्हा या चारही प्रभागात भाजपचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा दिसून आले.

Kalamboli Election Result
Panvel Election Result 2: नात्यांवर मात करत मेव्हण्याचा विजय; पनवेलमध्ये दाजी–मेव्हण्याची लढत चर्चेत

प्रभाग 7-चुरसीची लढत

प्रभाग 7 मधील मतदाराची आकडेवारी सांगताना कोणतीच चुरस दिसून आली नाही. भाजपचे चारही उमेदवार निवडून येऊन त्यांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांचा चांगलाच पराभव केला.हा प्रभाग हाय व्होल्टेज ड्रामा झालेला ठरला होता. या ठिकाणी माजी तिन्ही उमेदवारांनी पुन्हा आपल्या विजयाची परंपरा राखलेली आहे. यामध्ये प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे मंडळ अध्यक्ष अमर पाटील यांनी 9575 मते मिळवून त्यांचे प्रतिस्पर्धी सुदाम पाटील यांचा पराभव केला आहे त्यांना 7086 मते मिळालेली आहेत. तर याच प्रभागातील माजी नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांना 9487 मते मिळून त्यांनी विजय संपादित केलेला आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी विद्या मंगल गायकवाड यांना 6784 मते मिळाली आहेत. याच प्रभागातील भाजपच्या मनाली ठाकूर यांना 9317 मते मिळून ते विजयी झालेेत.तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मल पाटील यांना 6843 मते मिळालेली आहेत. याच प्रभागातील माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी विजयाची परंपरा कायम राखून 8224 मते मिळून ते विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रदीप ठाकूर यांना 6953 मते मिळून ते पराभूत झाले आहे.

Kalamboli Election Result
Panvel Election Result: पनवेल महापालिकेवर पुन्हा भाजप महायुतीची एकहाती सत्ता; ५९ जागांसह दणदणीत विजय

प्रभाग 8-दिग्गजांचा पराभव

कळंबोलीतील प्रभाग क्रमांक आठ हा प्रचंड चर्चेत असलेला प्रभाग होता. या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या प्रभागांमध्ये माजी नगरसेवक अ गटातून बबन नामदेव मुकादम यांनी 6828 मते मिळून सतीश पाटील यांचा पराभव केला आहे. सतीश पाटील यांना 5001 मते मिळाली आहेत. याच प्रभागातील ब गटामधून शिवसेनेच्या शहरप्रमुख सायली सरक यांनी 7791 मते मिळून विजय संपादन केलेला आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मयुरी जाधव यांना 3916 मते मिळालेली आहेत या प्रभागातील क गटामधून मागील वेळेस भाजपाच्या तिकिटावर निसटता पराभव पत्करलेल्या बायजा बबन बारकजे यांनी 6630 मते मिळवून महाविकास आघाडीच्या रश्मी कदम यांचा पराभव केला आहे. रश्मी कदम यांना 4639 मते मिळालेली आहेत. याच प्रभागातील ड विभागामध्ये रामदास वामन शेवाळे यांनी 5443 मते मिळून विजय संपादित केला.तर त्यांनी अपक्ष उमेदवार रोहन पाटील यांचा पराभव केला आहे. रोहन पाटील यांना 3215 मते मिळाली आहेत.

Kalamboli Election Result
NOTA Votes in Panvel | पनवेल महापालिका निवडणुकीत ‘नोटा’चा ठळक संदेश; ४३ हजारांहून अधिक मतदारांचा उमेदवारांना नकार

प्रभाग 9- महायुतीचेवर्चस्व

कळंबोलीतील प्रभाग नऊच्या निकालामध्ये सुद्धा महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवलेले आहे. यामधील प्रभाग नऊ मधील अ गटातून महादेव जोमा मधे यांनी 6210मते मिळून विजय मिळवलेला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी मालती राजेश पिंगळा यांना 4257 मते मिळाली आहेत. तर याच प्रभागातील ब गटातून ॲड. प्रतिभा सुभाष भोईर यांना 7764 एवढी मते मिळून त्यांनी विजय संपात केला आहे.तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारती विश्वास पेटकर यांचा पराभव केला आहे. भारती पेटकर यांना 3843 एवढी मते मिळालेली आहे. याच प्रभागातील क विभागातून महायुतीच्या दमयंती निलेश भोईर यांनी 7728 मते मिळवून विजय संपादित केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी नीलिमा संदीप पाटील यांचा पराभव केला आहे.नीलिमा पाटील यांना 3633 एवढी मते मिळालेली आहेत.तर याच प्रभागातील ड विभागातून शशिकांत शनिवार शेळके यांना 6741 एवढी मते मिळाली तर त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रकाश पंढरीनाथ म्हात्रे यांचा पराभव केला आहे प्रकाश म्हात्रे यांना 4838 एवढी मते मिळालेली.

Kalamboli Election Result
Panvel municipal election results : पनवेलमध्ये भाजप महायुतीचा दणदणीत विजय

प्रभाग10-राष्ट्रवादीचागजर

कळंबोली प्रभाग क्रमांक दहा मधील अ गटातून रवींद्र अनंत भगत यांना 8452 एवढी मते मिळाली तर पराभूत उमेदवार गोपाळ रामा भगत 4658 एवढी एवढी मते मिळाली आहेत. गटामधून सरस्वती काथरा यांना 6055 एवढी मते मिळाली असून पराभूत उमेदवार माने यांना 3359 मते मिळाली आहेत. याच प्रवागातील क विभागातून मोनिका प्रकाश महानवर यांना 8592 मते मिळाले तर पराभूत उमेदवार शीतल माळवे यांना 3027 मते मिळालेली आहेत. याच प्रभागातील ड विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय मनोहर खानावकर यांना 9914 एवढी मते मिळाली असून विजयी झाले आहेत तर पराभूत उमेदवार संतोष जाधव यांना 2805 एवढी मते मिळालेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news