Panvel News: पनवेल प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व

अ, ,ड समितीच्या सभापतींची निवडणूक ; प्रभाग समिती क , ब ची सभापती निवड
Panvel News
Panvel NewsPudhari
Published on
Updated on

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग अ,ब क,ड साठी प्रभाग समिती सभापती निवडणूक मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे घेण्यात आली. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे होते.

पीठासीन अधिकाऱ्यांसह पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशित सदस्यांमधून नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांचेकडे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर ही निवड प्रक्रिया घेण्यात आली .

Panvel News
Water Transport Project: जलवाहतूक ठरणार महामुंबईचा गेमचेंजर प्रवाशांची होणार ट्रॅफिकमधून सुटका !

प्रभाग समिती अ

प्रभाग समिती अ खारघर मध्ये महापालिका सदस्य रविंद्र भगत व महापालिका सदस्य योगिता फडके यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये महापालिका सदस्य रविंद्र भगत यांना 13 मते मिळाली व योगिता फडके यांना 4 मते मिळाली. प्रभाग अ मधून रविंद्र भगत यांना विजयी घोषित करण्यात आले.

प्रभाग समिती ब व क

प्रभाग समिती ब मध्ये महापालिका सदस्य मधू पाटील व प्रभाग क मधून महापालिका सदस्य रविंद्र जोशी यांचा सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या ठिकाणी बिनविरोध निवड झाली.

Panvel News
Pen Railway Station Redevelopment: पेण रेल्वे स्टेशन विकासाच्या वाटेवर

प्रभाग समिती ड

तसेच प्रभाग समिती ड मध्ये महापालिका सदस्य अजय बहिरा व महापालिका सदस्य मनिषा म्हात्रे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी झालेल्या मतदान प्रकियेत सदस्य अजय बहिरा यांना १९ मते पडली व सदस्य मनिषा म्हात्रे यांना ३ मते मिळाली. प्रभाग समिती ड मधून महापालिका सदस्य अजय बहिरा याना विजयी घोषित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news