Eco Friendly Ganeshotsav: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पनवेल महापालिका सज्ज

"पर्यावरण वाचवा, उत्सवाचा आनंद घ्या" संकल्पना; आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
Eco Friendly Ganeshotsav
Eco Friendly GaneshotsavPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: श्री गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पनवेल शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी पनवेल महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

यंदाही पालिका हद्दीतील सर्व गणेश मूर्तिकारांना मोफत शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येत असून, पनवेलमधील कुंभारवाडा परिसरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांपर्यंत ही माती पोहोचविण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक मूर्तीकलेला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्तिकारांची विशेष बैठक आयोजित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व, शाडूच्या मातीच्या मूर्तींचे फायदे, नैसर्गिक रंगांचा वापर आणि प्रदूषणमुक्त विसर्जन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Eco Friendly Ganeshotsav
Mangaon Indapur Bypass: गणेशोत्सवापूर्वी बायपास होणार सुरू; मंत्री आदिती तटकरेंकडून कामांची पाहणी

मागील वर्षी महापालिकेने ३४ टन शाडूची माती मूर्तिकारांना मोफत वितरित केली होती. यंदाही अधिकाधिक मूर्तिकारांनी शाडूच्या मातीचाच वापर करावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मातीचे वितरण सुरू आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण वाढत असल्याने शाडूच्या मातीच्या मूर्तींचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शाडूची मूर्ती पाण्यात सहज विरघळत असल्याने नद्या, तलाव आणि खाड्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींसाठी विशेष जनजागृती मोहीम

"पर्यावरण वाचवा, उत्सवाचा आनंद घ्या" या संकल्पनेतून महापालिका नागरिकांना शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक सजावट आणि कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करण्याचे आवाहन करत आहे.

Eco Friendly Ganeshotsav
LPG Cylinder Truck Accident: गॅस सिलेंडर भरलेला ट्रक पलटी; सावरोली,खारपाडा मार्गावरील घटना,मोठा अनर्थ टळला

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "श्री गणेशावरील श्रद्धा जपत पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक गणेशभक्ताने शाडूच्या मातीची मूर्ती स्वीकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.

आपल्या छोट्या कृतीतून पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित पनवेल निर्माण करण्यास निश्चितच मदत होईल." यंदाचा गणेशोत्सव भक्ती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून पनवेलकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news