Panvel Municipal Corporation: पनवेल महापालिकेच्या दशकपूर्तीवर खर्चाला ब्रेक! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात मोठी कपात

सर्व कार्यक्रम एकाच दिवशी; महापौर निवासावरील विद्युत रोषणाईही टाळणार
panvel municipal corporation
panvel municipal corporationPudhari
Published on: 
Updated on: 

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला येत्या १ ऑक्टोबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. दशकपूर्तीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि नागरिकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे १ ते १९ ऑक्टोबरदरम्यान स्वतंत्रपणे नियोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम आता एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहेत. परिणामी कार्यक्रमांवरील अतिरिक्त खर्चाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

panvel municipal corporation
Palghar Road Accident: खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कंटेनरखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

महापालिकेच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने १ ते १९ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खर्चात बचत करण्याचा निर्णय महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला आहे. नागरिकांकडून जमा होणाऱ्या निधीचा अनावश्यक वापर होऊ नये, यासाठी दशकपूर्तीचा सोहळा साधेपणाने साजरा करण्यावर भर देण्यात येणार आहे.

panvel municipal corporation
Ganeshotsav Nirmalya Collection: गणेशोत्सवानंतर निर्माल्याचा ‘उपयोगी’ पुनर्वापर! ७१ टन ९९० किलो निर्माल्यापासून तयार होणार खत

केवळ मुख्यालयालाच एक दिवसाची विद्युत रोषणाई

दरवर्षी महापालिका मुख्यालयासह महापौर निवासस्थानीही विद्युत रोषणाई केली जाते. मात्र, यंदा त्यातही कपात करण्यात आली आहे. महापौर निवासस्थानी विद्युत रोषणाई केली जाणार नसून, केवळ पनवेल महापालिका मुख्यालयावर एका दिवसासाठी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन पाटील यांनी दिली.

राज्यात दुष्काळ पडलेला असताना वर्धापनदिनाच्या सोहळ्यावर खर्च करणे नसल्याने साधेपणानेच कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

पालिकेच्या वाटचालीचा, विकासकामांचा आढावा

दशकपूर्ती सोहळ्यात गेल्या दहा वर्षांतील पनवेल महापालिकेच्या वाटचालीचा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्यानागरिकांसाठीच्या विविध उपक्रमांवरही भर देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीत पनवेल शहरासह पालिका क्षेत्रात विकासकामे करण्यात आली आहेत. ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासह भविष्यातील विकासाचा रोडमॅप दशकपूर्तीच्या निमित्ताने मांडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news