Ganeshotsav Nirmalya Collection: गणेशोत्सवानंतर निर्माल्याचा ‘उपयोगी’ पुनर्वापर! ७१ टन ९९० किलो निर्माल्यापासून तयार होणार खत

६ विसर्जन दिवसांत २२ नैसर्गिक आणि १५६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर निर्माल्य जमा
Ganeshotsav Nirmalya Collection
Ganeshotsav Nirmalya CollectionPudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: गणेशोत्सवातील ६ विसर्जन दिवसांमध्ये २२ नैसर्गिक व १५६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात ७१ टन ९९० किलो निर्माल्य जमा झाले. या निर्माल्यापासून आता उद्यानांसाठी खतनर्मिती केली जाणार आहे.

हे निर्माल्य संकलित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र निर्माल्य वाहतुक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

गणेशोत्सवात विसर्जनस्थळी येणाऱ्या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे 'ओले निर्माल्य' तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे 'सुके निर्माल्य' ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था केली होती.

Ganeshotsav Nirmalya Collection
Coastal Road Accident: कोस्टल रोड की रेसिंग ट्रॅक? अडीच वर्षांत १२ हाय-एंड कार अपघात; सात जणांचा मृत्यू

यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत गौरींसह सातव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी सर्वाधिक २५,९९० टन तसेच दीड दिवसांच्या विसर्जनदिनी १४,५१० टन निर्माल्य आणि अनंतचतुर्दशीदिनी दहाव्या दिवसाच्या विसर्जनप्रसंगी १०, ९५० टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

Ganeshotsav Nirmalya Collection
Mumbai Rainfall: महामुंबईत पावसाची शतकी खेळी! शहरात साडेसहा टक्के कमी पाऊस

पाचव्या दिवाशी १२,५५५ टन तसेच सातव्या दिवशी ७१५५ किलो आणि १० व्या दिवशी ८७० किलो निर्माल्य गोळा झाले.

हे निर्माल्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. यामधून महापालिका क्षेत्रातील उद्याने फुलविली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news