Palghar Road Accident: खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कंटेनरखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

पालघरमधील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे दुर्लक्ष
accident
accidentfile photo
Published on: 
Updated on: 

पालघर शहर: रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार वृद्धाचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर येथे घडली आहे. ब्रिजमोहन भोलाराम निर्मल (७५) असे मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडलेल्या अपघातात एका व्यक्तीच जीव गेल्याने नागरिकांमधून याबाबत संताप आणि रोष व्यक्त होत आहे.

पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा वर्दळीचा परिसर असून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा या परिसरातून सुरू असते. या या परिसरात रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळेच एक भीषण अपघात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडला आहे.

accident
Ganeshotsav Nirmalya Collection: गणेशोत्सवानंतर निर्माल्याचा ‘उपयोगी’ पुनर्वापर! ७१ टन ९९० किलो निर्माल्यापासून तयार होणार खत

७५ वर्षीय ब्रिजमोहन निर्मल हे त्यांची दुचाकी घेऊन जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्यावरील खड्डा चुकावण्याच्या प्रयत्न त्यांच्या दुचाकी खड्ड्यात स्लीप झाली.

दुचाकी स्लिप झाल्याने ब्रिज मोहन निर्मल दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडली याच दरम्यान मागून आलेल्या अवजड कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत ब्रिजमोहन निर्मल हे टेंभोडे- समर्थनगर परिसरातील रहिवासी असून आहे.

accident
Coastal Road Accident: कोस्टल रोड की रेसिंग ट्रॅक? अडीच वर्षांत १२ हाय-एंड कार अपघात; सात जणांचा मृत्यू

पालघर शहर परिसरात रस्त्यांवर खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात घडत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एका वृद्धाला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडलेल्या अपघातात जीव गमवावा लागला असून नागरिकांमधून याबाबत रोष व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अजून किती निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागेल ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news