Panvel Karjat Suburban Railway: पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर 85% पूर्ण; एमएमआरमधील प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा

२,७८२ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात; तीन बोगदे, ४७ पूल आणि पर्यायी मार्गामुळे कल्याणवरील ताण कमी होणार
Panvel Karjat Suburban Railway
Panvel Karjat Suburban RailwayPudhari
Published on
Updated on

पनवेल : राजेश डंगळे

पनवेल ते कर्जत दरम्यान उभारला जात असलेला पनवेलकर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प 85 टक्के पूर्णत्वास पोहोचला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी हा मार्ग दिलासादायक ठरणारा आहे. सुमारे 29.6 किलोमीटर दुहेरी मार्गाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 2,782 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

Panvel Karjat Suburban Railway
Malad Fruit Poison: मालाडमध्ये धक्कादायक प्रकार: फळांवर ‘रॅटोल’ लावून विक्री, दोन विक्रेते पोलिसांच्या ताब्यात

पनवेल यार्डमधील जटिल बदल, सिग्नलिंग सुधारणा आणि वाहतूक न खंडता करण्यात आलेली कामे ही अभियांत्रिकी कौशल्याची उदाहरणे ठरली आहेत. सध्या बोगद्यांतील लाईनिंग, ट्रॅक बसविणे, वीजवाहिनी आणि सिग्नल प्रणालीची कामे वेगाने सुरू आहेत.

हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर कल्याण मार्गावरील ताण कमी होऊन सीएसएमटीकर्जत दरम्यान पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

Panvel Karjat Suburban Railway
Jayant Patil: सीमाप्रश्नावर जयंत पाटील यांचा सरकारला टोला; फडणवीसांनी पुढाकार घ्यावा

तसेच तळोजा व परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळून नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित व आरामदायी होणार असल्याने हा प्रकल्प प्रदेशासाठी विकासाची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे.

Panvel Karjat Suburban Railway
Mumbai Air Pollution: मुंबईतील वायू प्रदूषणावर महापालिकेचा 159 कोटींचा ‘क्लीन एअर’ प्लॅन

तीन बोगदे,47 पूल

या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहोपे), चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके उभारली जात आहेत. विशेष म्हणजे अवघड डोंगराळ व जंगल परिसरातून तीन बोगदे (एकूण 3,206 मीटर) आणि 47 पूल उभारण्यात आले आहेत. पनवेल व कर्जत येथे रेल्वे फ्लायओव्हरचे काम अंतिम टप्प्यात असून सर्व प्रमुख व लघुपूल पूर्ण झाले आहेत.वावरले गावांत 2,6 मी बोगदा अत्याधुनिक तयार करण्यात आला असून सर्व सुरक्षित यंत्रणा बसाविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news