Malad Fruit Poison: मालाडमध्ये धक्कादायक प्रकार: फळांवर ‘रॅटोल’ लावून विक्री, दोन विक्रेते पोलिसांच्या ताब्यात

ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ; मनसे कार्यकर्त्यांच्या पाळतीनंतर उघड झाला प्रकार, दुकान सील
Malad Fruit Poison
Malad Fruit PoisonPudhari
Published on
Updated on

मालाड : मालाड परिसरातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन फळ विक्रेते फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी‌‘रेटिनॉल‌’(उंदीर मारण्याचे औषध) लावून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मनोज कुमार केसरवानी, बिपिन केसरवानी अशी दोघांची नावे आहेत. त्यांचे दुकान सील केले आहे.

Malad Fruit Poison
Jayant Patil: सीमाप्रश्नावर जयंत पाटील यांचा सरकारला टोला; फडणवीसांनी पुढाकार घ्यावा

उत्तर भारतीय फळ विक्रेता फळांवर ‌‘रॅटोल‌’ हे उंदीर मारण्याचे औषध लावत असल्याचा प्रकार मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. मनसेचे कार्यकर्ते कुणाल साळुंखे यांनी काही दिवस पाळत ठेवून संबंधित विक्रेत्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ मालाड पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला. तक्रारीचे गांभीर्य ओळखून मालाड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. चौकशी दरम्यान, आरोपींनी आपली चूक कबूल केली

Malad Fruit Poison
Mumbai Air Pollution: मुंबईतील वायू प्रदूषणावर महापालिकेचा 159 कोटींचा ‘क्लीन एअर’ प्लॅन

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे उपविभाग सचिव जब्बार शेख यांनी मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कठोर कारवाईची मागणी केली. मुंबईत फेरीवाला मुक्त मोहिमेची घोषणा झाली होती. मात्र परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची सखोल चौकशी करून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news