Panvel Gas Cylinder Supply: गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर करडी नजर

इराण-अमेरिका तणावाचा परिणाम; २५ दिवस प्रतीक्षा असूनही तुटवडा नसल्याचा दिलासा
Panvel Gas Cylinder Supply
Panvel Gas Cylinder SupplyPudhari
Published on
Updated on

कळंबोली : इराण-अमेरिका युद्धाची परिणीती घरगुती गॅस सिलेंडरवर झाल्याचे प्रकर्षाने सर्व राज्यभर दिसून आले. परंतु पनवेल तालुक्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम च्या गॅस एजन्सीच्या पंधरा वितरकांकडून सुरळीतपणे गॅसचे वितरण होत असल्याचे पनवेलच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे यांनी ‌‘दै. पुढारी‌’शी बोलताना सांगितले. गॅस सीलेंडरच्या काळ्याबाजारवर करडी नजर असल्याचे धनवे यांनी सांगितले.

Panvel Gas Cylinder Supply
BMC Renewable Energy: पालिका शाळा आता अक्षय ऊर्जेवर; वरळीत ११ शाळांमध्ये प्रयोग सुरू

इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे समाज जीवनावर विविध विपरीत परिणाम दिसून येत आहेत. पूर्वी सहजरित्या मिळणारे गॅस सिलेंडर आता तब्बल 25 दिवसाच्या बुकिंग नंतर मिळू शकणार आहे. फोनवर संपलेल्या गॅसचे पूर्वी बुकिंग होत होते. परंतु आता भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमने याबाबतचे एक ॲपच विकसित करून या ॲपद्वारे आता गॅसचे बुकिंग होणार आहे. ज्याच्या नावावर गॅसचे कनेक्शन आहे त्यांना संबंधित गॅस एजन्सीकडे येऊन स्वतःच्या चेहऱ्याची केवायसी करावी लागणार आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर त्याचा संदेशही भ्रमणध्वनीवर आता मिळू लागला आहे. तरीसुद्धा गॅस आपल्याला मिळेल की नाही या भीतीपोटी नागरिक गॅस एजन्सीच्या कार्यालयात गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सद्यस्थितीत व्यवसायिक गॅस सिलेंडरचे वितरण कमी प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम सर्वत्र झाल्याचे दिसत आहे.

गॅस, पेट्रोलबाबत नागरिकांमध्ये शंका कुशंका निर्माण झाल्यानंतर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही एक चित्रफीत करून गॅस सिलेंडरचा पुरवठा हा नियमित सुरळीतच होणार असून त्याचा तुटवडा भासणार नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि गॅस एजन्सीचा इथे गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी केले होते.

Panvel Gas Cylinder Supply
Pulmonary Embolism Case: जीवघेण्या दुहेरी आजारावर मात; डॉक्टरांनी वाचवला महिलेचा जीव

पनवेलच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पनवेल तालुक्यामध्ये सिलेंडरचे वितरण हे नियमित आणि सुरळीतपणे चालू आहे. गॅसधारकांची कोणतीही कुचुंबना होऊ नये म्हणून 15 गॅस सिलेंडर पुरवठादारांकडून फोनच्या ॲपद्वारे नोंदणी करण्यात सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सिलेंडरबाबत कोणतीही भीती मनात न बाळगता गॅस वितरण कंपनीच्या कार्यालयात विनाकारण गर्दी ही कोणी करू नये. ज्यांचा गॅस सिलेंडर संपत आलेला आहे त्यांना निश्चितच सुरळीत व नियमितपणे गॅस सिलेंडर मिळेल याची योग्य ती तजबीज शासनाकडून अन कंपन्यांकडूनही करण्यात येत आहे.त्यातही मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे जे मजूर व अन्य कामगार आहेत त्यांनाही पाच किलो पर्यंतचे सिलेंडर पूर्वी जसे सहज मिळत होते तेही आता संबंधित काम करत असलेल्या कंपनीने जर पत्र दिले तर त्यांनाही उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर त्याबाबतचे ही नियोजन करण्यात येत आहे.

Panvel Gas Cylinder Supply
BMC Administration: मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल; सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांची खांदेपालट

खुल्या बाजारात जर गॅस सिलेंडरचा जर कोणी काळाबाजार करत असेल तर त्यांच्यावरही आमच्याकडून मेहेर नजर ठेवण्यात येणार आहे. जर कोणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करताना सापडल्यास त्यांच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाईचा बडगा ही उगारण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ज्यांच्याकडे कोणताही शासनाचा अन्नपदार्थ शिजवण्याचा परवाना नाही परंतु गॅस सिलेंडर वापरून खाद्यपदार्थ तळण्याचे काम खुल्या ठिकाणी करत असतील तर त्यांचीही तपासणी आमच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे पनवेल तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे यांनी सांगितले आहे.

पनवेलमध्ये गॅस सीलेंडरचा जर कोणी काळाबाजार करत असेल तर त्यांच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाईचा बडगा हा उगारला जाणार असून हातावर रोजचे मिळून रोजचे खाणारे जे मजूर आहेत, त्यांना आवश्यक असणाऱ्या गॅस सीलेंडर देण्याबाबतही वरिष्ठांशी चर्चा करून माणुसकी धर्मातून गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे पनवेल तालुक्याच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news