BMC Renewable Energy: पालिका शाळा आता अक्षय ऊर्जेवर; वरळीत ११ शाळांमध्ये प्रयोग सुरू

५ कोटींचा प्रकल्प; विजेची बचत आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
BMC Renewable Energy
BMC Renewable EnergyPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये अक्षय ऊर्जाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वरळीतील दोन शाळांसह अन्य 11 अक्षय ऊर्जाचा वापर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहेत.

BMC Renewable Energy
Pulmonary Embolism Case: जीवघेण्या दुहेरी आजारावर मात; डॉक्टरांनी वाचवला महिलेचा जीव

विजेच्या वापर कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्य, वारा, पाणी, आणि भूऔष्णिक उष्णता यांसारख्या नैसर्गिक व कधीही न संपणाऱ्या स्त्रोतांपासून अक्षय ऊर्जा तयार केली जाते. या ऊर्जेमुळे वाढते प्रदूषण रोखणे शक्य होणार होणार आहे.

सुरुवातीला पालिकेच्या प्रभादेवी जी दक्षिण विभागात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा व आदर्श नगर शाळा व अन्य 11 येथे या स्त्रोतांचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ठेकेदाराला डिसेंबर 2025 मध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अक्षय ऊर्जेपासून या दोन शाळा उजळून निघणार आहेत. यातून विजेची नाहीतर आर्थिक बचतही होणार आहे.

BMC Renewable Energy
BMC Budget 2026: मुंबई महापालिका मोडणार 36 हजार कोटींच्या ठेवी नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे

या शाळांमध्ये अक्षय ऊर्जेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास अन्य शाळांमध्येही अक्षय ऊर्जाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई महापालिका कार्यालय हॉस्पिटलमध्येही अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा आहे. यासाठी आर्थिक निधीची ही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

BMC Renewable Energy
Sunetra Pawar: रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हटलंय?

वरळी स्मशानभूमीतही अक्षय ऊर्जेचा वापर

वरली स्मशानभूमी येथेही अक्षय ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी 24 लाख 79 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. लवकरच या ऊर्जेतून स्मशानभूमीतील दिवे पेटतील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

BMC Renewable Energy
BMC Budget 2026: मुंबई महापालिका मोडणार 36 हजार कोटींच्या ठेवी नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे

अक्षय ऊर्जेचे मुख्य प्रकार

सौर ऊर्जा - सूर्याच्या प्रकाशापासून मिळणारी ऊर्जा

पवन ऊर्जा - वाऱ्याचा वापर करून टर्बाइन्सद्वारे तयार केलेली ऊर्जा

जल ऊर्जा - वाहत्या पाण्यापासून (नद्या, धरणे) निर्मित ऊर्जा

भूऔष्णिक ऊर्जा - पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेपासून मिळणारी ऊर्जा

बायोमास ऊर्जा - वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून मिळणारी ऊर्जा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news