Roha Ganeshotsav Rain: रायगडमधील गणेशोत्सवावर पावसाचे सावट

रोहे शहरासह तालुक्यात रविवारी दिवसभर पाऊस झाला. हवामान खात्याने गणेशोत्सवाच्या काळात पावसाची शक्यता वर्तवल्याने गणेशभक्तांच्या तयारीसह बाजारपेठेतील दुकानदारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Rain
RainPudhari
Published on
Updated on

रोहे: यावर्षी पाऊस उशिरा चालू झाला. परंतु हवामान खात्याने अंदाज दिल्यानंतर या गणेशोत्सवामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे.

मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गणेश उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. परंतु हवामान खात्याने गणेशोत्सवा दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने यावर्षी गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे‌.

Rain
मुंबई महापालिकेच्या उपहारगृहांवर आता १०० अधिकाऱ्यांची नजर; स्वच्छ आणि सुरक्षित अन्नासाठी समिती

त्याची सुरुवात म्हणून रविवारी दिवसभर रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाऊस पडला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या गणेश भक्तांची हिरमोड झालीच परंतु त्याच बरोबर दुकानदारांनाही ऐन गणेश उत्सवामध्ये फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news