Panvel HPCL Cylinder Search | पुरात वाहून गेलेल्या एचपीसीएलच्या १ हजार सिलेंडरचा शोध; चावणे ग्रामस्थांच्या प्रामाणिकपणामुळे कंपनीला दिलासा

सुमारे तीन हजार सिलेंडर वाहून गेल्याची माहिती; स्थानिकांच्या सहकार्यामुळे मोठे यश
HPCL Gas Cylinders
HPCL Gas CylindersPudhari
Published on
Updated on

HPCL Gas Cylinders

पनवेल : चावणे-जांभिवली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत एचपीसीएल (हिंदुस्तान पेट्रोलियम) कंपनीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळल्याने कंपनीच्या आवारातील मोठ्या प्रमाणातील गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यासोबत वाहून जाऊन पाताळगंगा नदीत पोहोचले. या घटनेनंतर कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने सुमारे तीन हजार सिलेंडर वाहून गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर पाताळगंगा नदीचे पात्र, ओढे, शेत परिसर तसेच नदीकाठच्या भागात सिलेंडरचा शोध घेण्यात आला. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. विशेषतः चावणे गावातील ग्रामस्थांनी विविध ठिकाणी सापडलेले सिलेंडर गोळा करून ते एचपीसीएल कंपनीच्या ताब्यात सुपूर्द केले.

HPCL Gas Cylinders
Panvel Slab Collapse: पनवेल महापालिका क्षेत्रात स्लॅब कोसळण्याच्या घटनांत वाढ

ग्रामस्थांच्या प्रामाणिक सहकार्यामुळे आतापर्यंत सुमारे १,००० गॅस सिलेंडर शोधून कंपनीकडे जमा करण्यात यश आले आहे. त्यामुळे वाहून गेलेल्या सिलेंडरपैकी मोठ्या प्रमाणात सिलेंडर सुरक्षितपणे परत मिळाल्याने कंपनी प्रशासनाला दिलासा मिळाला आहे, अशी माहिती एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुराच्या संकटात कोणताही स्वार्थ न ठेवता ग्रामस्थांनी दाखविलेली प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कंपनी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने शोधमोहीमेत सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले असून उर्वरित सिलेंडरचा शोध अद्याप सुरू असल्याचे सांगितले. पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

HPCL Gas Cylinders
Panvel Assault Investigation: गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार उघड

वाहून गेलेले सिलेंडर रिकामेच होते : एचपीसीएल

पूराच्या पाण्यात वाहून गेलेले सिलेंडर हे १४.२ किलो क्षमतेचे घरगुती वापराचे रिकामे सिलेंडर असल्याची माहिती एचपीसीएल प्रशासनाने दिली. कंपनीत रिफिलिंगचे काम सुरू असताना ही घटना घडली होती. एका दिवसाच्या शोधमोहीमेत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सुमारे १,००० सिलेंडर परत मिळविण्यात यश आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news