Panvel Assault Investigation: गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार उघड

गुन्हा दाखल; आरोपीचा शोध जारी
Panvel Assault Investigation
Panvel Assault Investigationfile photo
Published on
Updated on

पनवेल: ग्रामीण पनवेलमधील २५ वर्षीय गतिमंद आदिवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना प्रसुतीनंतर उघडकीस आली आहे.

कुटुंबीयांनी हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असला, तरी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकरण समोर आले. पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी डीएनए आणि न्यायवैद्यक तपास सुरू केला आहे.

Panvel Assault Investigation
BMC BEST Drivers Proposal: पालिका १.२९ लाख पगारावर बेस्‍टचे १९० चालक घेणार

पीडित तरुणी गर्भवती असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर तिला तालुक्यातील नातेवाईकांकडे पाठविण्यात आले. अपत्य नसलेल्या त्या दाम्पत्याने जन्माला येणारे बाळ दत्तक घेण्याचा विचार केला होता. त्यानुसार प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करताना कागदपत्रांमध्ये दुसऱ्या महिलेचे नाव वापरण्यात आल्याचे समोर आले.

दरम्यान, २६ जून रोजी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तरुणीने एका बालिकेला जन्म दिला. रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना माहितीतील विसंगती आढळल्याने त्यांनी पोलिसांना कळविले.

Panvel Assault Investigation
BDD Chawl Water Supply: चाळीत असताना ३ तास पाणी; आता टॉवरमध्ये केवळ ४० मिनिटे

मानसशास्त्रीय परीक्षणात पीडितेचा बुद्ध्यांक केवळ ११ असल्याचे निष्पन्न झाले. ती माहितीपूर्ण संमती देण्यास सक्षम नसल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. त्यानंतर पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक सरदार वसेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news