Panvel MD drugs arrest|बोगस पत्रकारासह दोघांना एमडी ड्रग्जसह अटक; पनवेलमध्ये खळबळ!

करंजाडे येथे पोलिसांची कारवाई; १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघे साथीदार पोलिसांच्या रडारवर
Panvel MD drugs arrest
Panvel MD drugs arrestPudhari photo
Published on: 
Updated on: 

पनवेल : पत्रकार असल्याचे भासवणाऱ्या जितीन हरीश शेट्टी (वय २५) याच्यासह दोघांना मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. करंजाडे परिसरात एमडी सदृश्य अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईत पोलिसांनी ९.३४ ग्रॅम वजनाचा एमडी सदृश्य पदार्थ, दोन मोबाईल फोन आणि एक स्कूटर असा एकूण १ लाख ४८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणातील रोशन पवार आणि उमंग गुप्ता यांचा शोध सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७९१/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ च्या कलम ८(क) आणि २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितीन हरीश शेट्टी (वय २५, रा. तक्का गाव, पनवेल) आणि राज अजयकुमार मिश्रा (वय २३, रा. एचओसी कॉलनी, पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास करंजाडे येथील कॉलेज फाटा ते चिंचपाडा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याजवळ ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली. दोन्ही आरोपींकडे विक्रीच्या उद्देशाने मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगलेला आढळल्याचा आरोप आहे.

जप्त केलेल्या पदार्थाची किंमत २८ हजार २०० रुपये नसून, अहवालानुसार २८ हजार २० रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, २० हजार रुपये किमतीचा टेक्नो कंपनीचा मोबाईल आणि ८० हजार रुपये किमतीची वेस्पा स्कूटर जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४८ हजार २० रुपये असल्याचे अहवालात नमूद आहे.

Panvel MD drugs arrest
Raigad Heatstroke Prevention: रायगडमध्ये उष्माघाताचा धोका; आता ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत AC कक्ष उभारणार

या प्रकरणात संजय अस्पतवार, पोलीस उपनिरीक्षक, यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अभिजीत अभंग, पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तसेच फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले होते.

Panvel MD drugs arrest
Konkan Coir Industry: कोकणातील काथ्या उद्योगाची जागतिक भरारी; निर्यातीत ३०५% वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news