Raigad Heatstroke Prevention: रायगडमध्ये उष्माघाताचा धोका; आता ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत AC कक्ष उभारणार

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना तातडीचे उपचार देण्यावर भर
heatstroke
heatstrokepudhari photo
Published on: 
Updated on: 

अलिबाग: एल निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक वातानुकूलित कक्ष निर्माण करण्याचा ठराव रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघातामुळे प्रभावित नागरिकांना सेवा पुरविणे सोयीचे ठरणार आहे.

देशभरात सध्या एल निनोच्या प्रभावामुळे उष्णमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात दिवसा कमाल ३६ ते किमान ३० अंशांपर्यंत तापमान जाणवत आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये उष्माघाताचा धोका संभवतो.

उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित खोली निर्माण करण्याचे निर्देश रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांनी दिले आहेत.

heatstroke
Mumbai CSMT News|सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

उष्माघात हा गंभीर स्वरूपाचा धोका असून त्यामुळे काही वेळा रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच उष्णतेमुळे बाधित झालेल्या रुग्णांना वेळेत शक्यता उपचार मिळणे आणि त्यांना योग्य वातावरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित खोलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच आवश्यक आरोग्यसेवा मिळावी तसेच उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, हा या निर्णयामागील प्रमुख उ‌द्देश आहे.

या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित आरोग्य अधिका-यांनी आवश्यक नियोजन करावे आणि सर्व ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित खोली निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

heatstroke
Navi Mumbai RTO: नवी मुंबईत परराज्यातील १५ वाहनांना दंडात्मक नोटिसा; आरटीओची तपासणी मोहीम

उष्माघातापासून बचाव करण्याचे उपाय

  • नियमित पाणी प्यावे.

  • दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो

  • बाहेर जाणे टाळावे.

  • बाहेर जाताना टोपी, छत्री आणि

  • सैल कपडे वापरावेत.

  • ताक, लिंबूपाणी पेयांचे सेवन करा.

प्रथमोपचार

बाधित व्यक्तीला सावलीत

किंवा थंड ठिकाणी न्यावे.

अनावश्यक घट्ट कपडे सैल करावे.

शरीरावर थंड पाणी शिंपडा.

ओल्या कपडाने शरीर पुसा.

त्वरीत आपत्कालीन रुग्णवाहिकेला संपर्क करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news