Torrent Power Project: सायडोंगर वाचवण्यासाठी महाराष्ट्र एकवटला; टोरेन्ट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

फौजदारी तक्रार दाखल करण्याबरोबरच राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याचा इशारा
Torrent Power Project
Torrent Power ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

आनंद सकपाळ

नेरळ: ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात प्रस्तावित टोरेन्ट पॉवरच्या ३ हजार मेगावॅट पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून आता संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. राज्यभरातील नागरिक सायडोंगर वाचविण्यासाठी पुढे येत आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत आणि भीमाशंकरच्या लगतच्या डोंगररांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या टोरेन्ट पॉवरच्या ३ हजार मेगावॅट पंप्ड स्टोरेज प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यातील पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Torrent Power Project
Mumbai Police: ३६ वर्षांपासून फरार आरोपी गुजरातमधून जेरबंद

सुमारे २३३ हेक्टर म्हणजेच जवळपास ६०० एकर वनक्षेत्राशी संबंधित या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याचा दावा करत विविध राजकीय पक्ष, पर्यावरणप्रेमी, सामाजिक व आदिवासी संघटनांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

या प्रकल्पाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांसह अन्य राजकीय पक्ष व संघटनांनी भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

Torrent Power Project
Housing Society Redevelopment Rules: पुनर्विकासात मनमानीला लगाम? निबंधकांच्या पत्राशिवाय महापालिकेची परवानगी नाही

तसेच पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी संघटना, लेखक-कलाकार आणि नागरिकांचाही विरोध असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाच्या भूमिकेबाबत विरोधकांनी टीका केली आहे.

भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्या हौतात्म्याची परंपरा लाभलेल्या या परिसरात जंगल, डोंगर आणि स्थानिक समाजाचे नाते पिढ्यान्‌पिढ्या जपले गेले आहे.

त्यामुळे साय डोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाकडे केवळ ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प म्हणून न पाहता, त्याच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि ऐतिहासिक परिणामांचा एकत्रित विचार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर साय डोंगरातील वृक्षतोड, स्थानिक जलस्रोत, आदिवासींचे पारंपरिक हक्क आणि जैवविविधता याबाबत स्वतंत्र व पारदर्शक अभ्यास करण्याची मागणी पुढे आली आहे.

साय डोंगर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माथेरानचे माजी वन संवर्धन समिती सदस्य तथा पर्यावरण कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान काही झाडांवर क्रमांक नोंदविण्याच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांच्या दाव्यानुसार, काही ठिकाणी दोन झाडांना एकच क्रमांक देण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी तीन-चार झाडे तोडूनही क्रमांक नसल्याचे निदर्शनास आले. चार झाडे तोडून कागदोपत्री एकाच झाडाची नोंद केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साय डोंगर परिसरात २००५ ते २३८८ क्रमांकापर्यंत झाडांचे क्रमांक आढळल्याचे सांगत, प्रत्यक्ष वृक्षतोडीची संख्या कागदोपत्री नोंदीपेक्षा अनेक पटीने अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.

‘वीज कोणासाठी?’ या प्रश्नावरूनही आंदोलन

पंप्ड स्टोरेज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष किती फायदा होणार, हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना स्थानिकांना रोजगार, वीजपुरवठा, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या स्वरूपात ठोस लाभ मिळणार का, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.